Tue, Apr 23, 2019 20:05होमपेज › Satara › सातारा : आहिर मुरा येथे वनव्याच्या आगीत दोन घरे खाक

सातारा : आहिर मुरा येथे वनव्याच्या आगीत दोन घरे खाक

Published On: Apr 26 2018 11:58AM | Last Updated: Apr 26 2018 11:58AMबामणोली/ महाबळेश्वर : वार्ताहर

आहिर मुरा (ता. महाबळेश्वर) येथे बुधवारी सायंकाळी वनव्यामुळे लागलेल्या आगीत दोन घरे, दोन जनावरे व जनावरांसाठी ठेवलेला चारा जळून खाक झाला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वरपासून ३२ किमी अंतरावर अहिरा मुर हे गाव आहे. नदीपलीकडे डोंगरावर असलेले उत्तेश्वर माणिक मंदिर परिसरामध्ये बुधवारी वनवा लागला होता. त्याची धग या गावात लागली होती. यामध्ये भगवान गंगाराम काळे व लक्ष्मण कोंडीबा ढेबे यांची घरे जळून खाक झाली. तसेच यामध्ये दोन जनावरेदेखील जळल्याने मृत झाली. यात संसारोपयोगी साहित्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मानाजी ठकू काळे(७५) आणि जाईबाई राघू ढेबे (वय ७०) हे दोघे जखमी झाले.

दोन्ही कुटुंबे ही धनगर समाजातील असल्याने त्यांचे जनावरे, चारा यासह खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याची माहीत कळताच महाबळेश्वर तहसील कार्यालयातील अधिकारी तलाठी, तसेच तापोळा विभागातील सामाजिक कार्यकर्ते गणेश उतेकर यांनी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा सुरू करून पुढील मदत सुरू केली.