होमपेज › Satara › आरफळचे दोन युवक तडीपार

आरफळचे दोन युवक तडीपार

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 10:55PMसातारा : प्रतिनिधी

जबरी चोरीसह विविध गुन्हे दाखल असलेल्या आरफळ (ता.सातारा) येथील दोन युवकांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे. अविनाश विलास दडस (वय 23) व संदीप दिलीप साबळे (दोघे रा. आरफळ) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

अविनाश दडस व संदीप साबळे या दोघांची टोळी असून दडस हा टोळीप्रमुख आहे. संशयित सर्वसामान्य लोकांना अडवून जबरी चोरीचे गुन्हे करत होते. विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर दोघांवर अटकेची कारवाई केली. अटकेची कारवाई केल्यानंतरही संशयितांमध्ये सुधारणा होत नव्हती. सर्वसामान्यांना संशयितांचा उपद्रव होत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत होती. यामुळे दोन्ही संशयितांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने सातारा तालुका पोलिसांनी दोघांविरुध्द तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठवला.

दोघा संशयितांची तडीपारीची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अखेर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दोघांना सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले. तडीपारीच्या आदेशाची सुनावणी झाल्यानंतर 48 तासाच्या आत कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यातील आणखी काही टोळ्या पोलिसांच्या रडारवर असून लवकरच पुढील कारवाई होणार आहे.