Wed, Jan 23, 2019 02:21



होमपेज › Satara › सातारा : आरक्षणासाठी जिल्हा परिषद सदस्यांचेच आंदोलन

सातारा : आरक्षणासाठी जिल्हा परिषद सदस्यांचेच आंदोलन

Published On: Aug 10 2018 1:00PM | Last Updated: Aug 10 2018 1:00PM



सातारा : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वीच मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणच्या मुद्द्यावर सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत सभागृहाबाहेर घोषणा देत आंदोलन केले.  इतर कोणत्याही जाती धर्माच्या आरक्षणला धक्का न लावता मराठा, धगनर, मुस्लिम समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे सदस्य आक्रमक झाले. 

सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहाबाहेर येऊन निदर्शने केली. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं... अशा घोषणांनी जिल्हा परिषदेचा चौथा मजला सदस्यांनी दणाणून सोडला होता. त्यानंतर सदस्यांशी जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी चर्चा केली. तसेच सर्वसाधारण सभेत आरक्षण संदर्भात ठराव घेऊ असे आश्वासन दिले त्यानंतर सदस्य शांत झाले. 

या आंदोलनानंतर सर्व सदस्य सभागृहात आले. त्यानंतर सभेला प्रारंभ झाला. अशी घटना जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा पहावयास मिळाली. तसेच जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, विरोधक सर्व सदस्य एकत्र येऊन हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाची चर्चा जिल्हा परिषदेत चांगली रंगली होती.