Thu, Nov 15, 2018 14:48होमपेज › Satara › सातारा : फॉर्च्युनरची काच फोडून सव्वा लाखाची चोरी

सातारा : फॉर्च्युनरची काच फोडून सव्वा लाखाची चोरी

Published On: Aug 24 2018 2:52PM | Last Updated: Aug 24 2018 2:52PMसातारा : प्रतिनिधी

विसावा नाका येथे पार्क केलेल्या फॉर्च्युनरची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख ७० हजार रुपयांच्या रकमेसह महागडे दोन मोबाईल असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. कार पार्क केल्यानंतर अवघ्या एका तासात ही घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

श्रीकांत भाउसाहेब पवार (रा. कूपर कॉलनी) यांनी याबाबतची शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ रोजी रात्री आठ वाजता तक्रारदार यांनी विसावा नाका येथील जीम समोर (एमएच ११ बीबी ९०९१) ही फॉर्च्युनर कार पार्क केली होती. ९ वाजता कारजवळ आल्यानंतर पाहिले असता अज्ञाताने दाराची काच फोडली होती. कारमधून चोरट्यांनी लेदर बॅगमधील रोख ७० हजार रुपये व ५० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरी झाले होते.

तक्रारदार यांनी परिसरात पाहणी केली असता त्याठिकाणी कोणीही नव्हते. शहर पोलिसांनी घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वर्दळीच्या ठिकाणी बिनधोकपणे चोरटे कारची काच फोडून चोरी करत असल्याने वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.