होमपेज › Satara › मालदन येथील 17 व्या शतकातील दगडी विहीर

मालदन येथील 17 व्या शतकातील दगडी विहीर

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 12:39AMतळमावले : नितीन कचरे 

मालदन (ता. पाटण) येथील माजी सरपंच शिवाजीराव काळे यांची 1799 सालची सुमारे दोनशे एकोणीस वर्षापूर्वीची दगडी बांधकामात केलेली विहिर त्यावेळच्या स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. मोठमोठ्या दगडामध्ये रेखीव बांधकाम केले आहे. अजूनही विहिरीला कोठेही साधा ओरखडाही पडलेला नाही. गुळगुळीत दगडांमधील हे बांधकाम म्हणजे सध्याच्या स्थापत्यशास्त्रासाठी मोठे गुढ असणार आहे. 

कोणतीही यंत्रसामग्री नसताना या विहिरीचे काम करण्यात आले आहे. पूर्वीच्या काळी मालदन येथील वांगनदीवरती पुल नव्हता. दळणवळणाची सुविधा नव्हती. तरी देखील विहिरीसाठी लागणारे मोठे दगड कसे आणले असतील याचा विचार करायला ते भाग पाडत आहे. या विहिरीचे संपूर्ण बांधकाम दगडाचे आहे. या विहिरीची रचना एखाद्या राजवाड्यासारखी आहे. अशी विहीर पुन्हा होणे नाही. दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत तरी देखील मजबूत अवस्थेत उभी आहे. सिमेंटच्या युगात या विहिरीने आपले वेगळेपण जपले आहे. या विहिरीमुळे ऐतिहासिक वारसा टिकून आहे त्याकाळी वाहतुकीची साधने नव्हती. वडार गाड्याच्या सहाय्याने ते दगड आणल्याची माहिती प्रतापराव काळे यांनी दिली. तसेच प्राचीन ठेवा जपून ठेवण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. दुर्मीळ विहिरीमध्ये मालदनच्या या विहिरीचा समावेश होईल. असा ऐतिहासिक ठेवा शासनाने जपून ठेवावा अशी मागणी होत आहे. मालदन (ता. पाटण) येथे दोनशे वर्षापूर्वीची दगडी बांधकामातील आमच्या विहिरीने ऐतिहासिक वारसा जपून ठेवला आहे. दोनशे वर्षे होऊन देखील विहीर मजबूत अवस्थेमध्ये आहे. या विहिरीचे बांधकाम एखाद्या राजवाड्यासारखे आहे.

 - शिवाजीराव काळे, माजी सरपंच  

 

Tags : satara, Maldan, masonry