Sun, Apr 21, 2019 06:08होमपेज › Satara › म‘श्‍वरमधील बेकायदेशीर बांधकामे थांबवा

म‘श्‍वरमधील बेकायदेशीर बांधकामे थांबवा

Published On: Apr 24 2018 10:30PM | Last Updated: Apr 24 2018 10:09PMसातारा : प्रतिनिधी

महाबळेश्‍वर पाचगणीमध्ये  पर्यटकांच्या गर्दीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  पोलिस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यांचा   अभ्यासपूर्वक अहवाल सादर करण्याच्या सूचना समितीने दिल्या.दरम्यान, महाबळेश्‍वर पाचगणी इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये अनधिकृत बांधकामे वाढली आहे. ही बांधकामे होणार नाही याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी, अशी सूचना समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी दिल्या.

महाबळेश्‍वर-पाचगणी इको सेन्सेटिव्ह झोन संदर्भात उच्चस्तरीय संनियंत्रण समितीची  मंगळवारी बैठक  महाबळेश्‍वर येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हाधिकारी श्‍वेता  सिंघल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  चंद्रशेखर जगताप,  समिती सदस्य  डॉ. राहूल मुंगीकर, तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी डी.पी.शिंदे, महाबळेश्‍वर पाचगणीच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बांधकाम परवान्यासंदर्भात महसूल विभागाने महाबळेश्‍वर तालुक्यातील तलाठ्यांची त्वरीत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात यावी. महाबळेश्‍वर व पाचगणी येथील गावठाणात मोठ्या प्रमाणात  बेकायदेशीर बांधकाम होत आहेत. या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी  तलाठी, ग्रामसेवक व नगरपालिकेच्या भागनिरीक्षकांची समिती नेमून त्यांना अनाधिकृत बांधकामावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. महाबळेश्‍वरमधील वेधशाळेच्या सुधारीत बांधकामावर चर्चा करण्यात आली .  बैठकीच्या सुरूवातीला महाबळेश्‍वर व पाचगणीतील ग्रामस्थांशी समितीच्या सदस्यांनी चर्चा केली. तसेच पाचगणी येथील व्यापारी संघाच्या सदस्यांनी पार्कींगबाबत चर्चा केली. महाबळेश्‍वर व पाचंगणी येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली की वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होतो. या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून तहसीलदार, मुख्याधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना बरोबर घेवून त्याचा अभ्यासपुर्वक अहवाल समितीला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महाबळेश्‍वर व पाचगणीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात मात्र पर्यटक येताना प्लॅस्टिक पिशव्या बरोबर घेवून येत असतात त्यासाठी प्रवेश करण्यापूर्वीच याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून पर्यटकांचे मन परिवर्तन करावे. ग्रामपंचायतीच्या सांडपाणी व घनकचर्‍याबाबत प्रकल्पाची  उभारणी  वनविभागाच्या जागेत करावी लागणार आहे. त्यासाठी जागा मागणीचे प्रस्ताव  संबंधित ग्रामपंचायतीनी वनविभागाकडे त्वरित पाठवण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या.