होमपेज › Satara › राज्यपाल पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

राज्यपाल पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Published On: Feb 12 2018 2:07AM | Last Updated: Feb 11 2018 8:50PMमारुल हवेली : वार्ताहर

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा वाढदिवस कराड येथे  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सकाळी प्रीतिसंगम येथील स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. पी. डी. पाटील  यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर कराड येथील संपर्क कार्यालयात व गोटे येथील निवासस्थानी त्यांनी शुभेच्छा स्विकारल्या. दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शंभूराज देसाई, कृष्णा सह. साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, कराड जनता बँकेचे चेअरमन राजेश पाटील  यांच्यासह मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून श्रीनिवास पाटील यांना शुभेच्छा दिल्या. 

दूरध्वनीवरून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर,  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. अनिल शिरोळे, खा. सुरेश प्रभू, माजी मंत्री मदन बाफना,  आ. नरेंद्र पाटील, आ. कांताताई नलावडे,  माजी आ. गजानन बाबर, प्रभाकर देशमुख, खा. संजय राऊत, वाईचे माजी आ. मदनराव भोसले, अभिनेत्री निशिंगधा वाड, प्रकाश बडेकर, बाळासाहेब शिवरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर, जिल्हाधिकारी श्‍वेेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, भाग्यश्री भाग्यवंत, मंदाताई म्हेत्रे, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जशराज पाटील  यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. तर प्रत्यक्ष भेट घेऊन पं.स.चे माजी सभापती देवराज पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हाध्यक्ष महादेव देसाई, नगरसेवक विनायक पावसकर, विक्रमबाबा पाटणकर,

संजय देसाई, फत्तेसिंह पाटणकर, दादा कदम, चिपळूण नागरी पतसंस्थेचे प्रशांत यादव, नांगरे पॉलिमर्सचे अभय नांगरे, वेळे येथील निलेश डेरे, सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन संजय नांगरे-पाटील, डॉ. रजनीकांत नांगरे, माणिकराव पाटील, केमिस्ट असोशिएशनचे नजीर मुलाणी, डॉ. दुलन मुलाणी, शिक्षक संजय नांगरे, उत्तम नांगरे, माजी सभापती रघुनाथ जाधव, तुकाराम आंबळे, रणजीत पाटील, शिवाजीराव जगदाळे, संजय हिरवे, नरेंद्र साळुंखे, मारूलचे सरपंच अशोक मगरे, उपसरपंच राजेंद्र नांगरे, नितिन शिंदे, पाटणच्या सभापती उज्ज्वला जाधव, सज्जन यादव, निवास सुतार, मिलिंद मस्के, मनसेचे दादासो शिंगण, पै. नाना घोडके, डॉ. शंतनू कुलकर्णी, पै. धनाजी पाटील, धैर्यशील पाटणकर,  बशीर खोंदू, रणजित पाटील, ए. पी. पाटील, अ‍ॅड. रविंद्र पवार, अतुल वास्के, महाराष्ट्र केसरी पै. संतोष वेताळ यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना शुभेच्छा दिल्या.


मैत्रीच्या नात्याला खा. शरद पवार यांच्याकडून उजाळा

माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयीन जीवनातील मैत्रीच्या नात्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देत शुभेच्छा दिल्या. तसेच रविवारी दुपारी गोटे येथील निवासस्थानी भेट देत खा. शरद पवार यांनी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना शुभेच्छा दिल्या.