Fri, Apr 26, 2019 09:27होमपेज › Satara › पुनीता गुरवांची सुमारे 70 लाखाची संपत्ती

पुनीता गुरवांची सुमारे 70 लाखाची संपत्ती

Published On: May 10 2018 2:02AM | Last Updated: May 10 2018 12:41AMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने घरझडती घेतली असता आतापर्यंत त्यांच्याकडे सुमारे 60 ते 70 लाखाची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी त्यांची पोलिस कोठडी संपणार असल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, पसार गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी या मूळच्या नंदूरबार जिल्ह्यातील असून त्यांच्या शोधासाठी पोलिस तिकडेही रवाना झाले आहेत.

सातारा लाचलुचपत प्रतिबंध तथा एसीबीने सोमवारी सायंकाळी प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे. एसीबी विभागाने पुनीता गुरव यांच्या संपत्तीच्या चौकशीला सुरुवात केल्यानंतर ती सुमारे 60 ते 70 लाख रुपयांची असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी दिली. यामध्ये फ्लॅट, प्लॉट, गाड्या, सोने यांचा समावेश असून अद्याप संपत्तीची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याच गुन्ह्याप्रकरणी वंदना वळवी यांना अटक करण्यासाठी पोलिस गेल्यानंतर मात्र त्या पसार झाल्या आहते. गेली तीन दिवस त्यांचा शोध सुरुच असून त्या सापडलेल्या नाहीत. वंदना वळवी या मूळच्या नंदूरबारच्या असल्याने पोलिसांचे एक पथक शोधासाठी तिकडेही गेलेले आहे.

 

Tags : satara, Puneita Gurava, wealth