Tue, Jun 18, 2019 20:37होमपेज › Satara › ‘पुढारी एज्यु दिशा’मध्ये ‘पॅशन फॉर नॉलेज’

‘पुढारी एज्यु दिशा’मध्ये ‘पॅशन फॉर नॉलेज’

Published On: Jun 09 2018 10:55PM | Last Updated: Jun 09 2018 10:28PMसातारा : प्रतिनिधी

‘पुढारी एज्यु दिशा’मध्ये नामवंत शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अनेक कोर्सेस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व सल्‍लाही मिळत असल्याने कोणी कोणता कोर्स निवडावा, याचा अचूक निर्णय विद्यार्थी-पालकांना घेता येत आहे. ‘पुढारी एज्यु दिशा’मध्ये ‘पॅशन फॉर नॉलेज’ म्हणजेच  ज्ञान मिळवण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. या प्रदर्शनाला दोन दिवसांत हजारो विद्यार्थ्यांनी भेटी देवून विविध कार्सेसची माहिती घेतली. 

संजय घोडावत युनिर्व्हसिटी प्रेझेंट ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ पुणे, असोसिएट्स स्पॉन्सर्स विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट पुणे, को-स्पॉन्सर्स चाटे ग्रुप शिक्षण समूह, मराठवाडा मित्रमंडळ, सूर्यदत्‍ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्‍त विद्यमाने दि. 8 ते 10 जून या दरम्यान ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन पोलिस करमणूक केंद्राच्या हॉलमध्ये करण्यात आले आहे. उद्घाटन झाल्यावर दुसर्‍या दिवशीही विद्यार्थी तसेच पालकांचा या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. 

दहावी व बारावी बोर्डाचा निकाल  जाहीर झाल्यामुळे  विद्यार्थी विविध विद्याशाखा  तसेच  व्यावसायिक विषयात चांगल्या दर्जाचे पदवी शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र ‘पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शनामध्ये पहायला मिळाले.  उद्यमशीलतेचं युग असल्यामुळे या प्रदर्शनात सहभागी झालेल्या नामवंत शिक्षण संस्थांनी अनेक कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी आणले आहेत.  हे कोर्सेस विद्यार्थ्यांना नवी दिशा  देवून जाणारे आहेत.  वाणिज्य विषयातील पदवी कोर्सेस याशिवाय   फायनान्शियल अकौंटिंग, ऑडिशन, टॅक्सेशन, बँकिंग, कॉस्टिंग आणि मॅनेजमेंटची माहिती विद्यार्थी व पालक घेत होते. उद्योग क्षेत्रात महत्वाचे मानले जाणार्‍या बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बी.बी.ए.),  बॅचलर इन कॉम्प्युटर अप्‍लिकेशन (बी.सी.ए.), बॅचलर ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (बी.एफ.एस.)  या कोर्सचीही विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.
इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी  क्षेत्रामध्ये भरपूर वाव असल्याने अशा शिक्षण संस्थांच्या स्टॉल्सनाही विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींशी विद्यार्थ्यांनी चर्चा करुन कोर्सेसची माहिती घेतली. आपल्या देशात खाजगी क्षेत्रात भरपूर आहे. चांगल्या विषयाची निवड केली तर चांगले यशस्वी करिअर करता येऊ शकते.  केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मॅकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रॉडक्शन इंजिनिअरिंग असे अनेक ट्रेड एकाच शाखेतून उपलब्ध आहेत. 

आज वस्त्रोद्योगातही गुणवंतांना मागणी आहे. टेक्सटाईल टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल केमिस्ट्री आदि कोर्सेसची त्यासाठी मदत होणार आहे. बी. टेक. तसेच एम. टेक.च्या माध्यमातून असे कोर्स करता येणार आहे. या कार्सेसनाही विद्यार्थी तसेच पालक पसंती देत आहेत. बॅचलर्स डिग्री प्रोग्राम इन बायोटेक्नॉलॉजी  ज्यात जेनेटिक्स, जेनॉम मॅपिंग आणि इतर बायोलॉजिकल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. बारावीनंतर व्यावसायिक कोर्समध्ये  इन्श्युरन्स कोर्स, ऑटोमोबाईल इंडिनिअरिंग कोर्सेस, हॉर्टिकल्चर आणि फ्लॉरिकल्चर कोर्स, फॅशन डिझायनर्स कोर्सेस हे पदवी पातळीवरील आहेत. अनिमेशनमध्येही करिअरच्या संधी आहेत. प्रोफेशनल डिप्‍लोमा इन कॅरॅक्टरमध्ये विविध  कोर्स करता येणार आहे.  असे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. भरपूर वाव असल्याने विद्यार्थी तसेच पालक  अशा कोर्सेसची माहिती घेताना स्टॉल्सवर दिसत आहेत.

गेले दोन दिवस सुरु असलेला ‘पुढारी एज्यु दिशा’ हा  ज्ञानयज्ञ फुलला आहे. त्यामुळे प्रदर्शनस्थळीचा शैक्षणिक माहोल  उपस्थितांना भारावून टाकत आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी तसेच पालक गर्दी करु लागले आहेत. अलंकार हॉलमधील सहभागी संस्थांचे स्टॉल, व्याख्यानमाला हॉल यांना तर कॉर्पोरेट लूक प्राप्त झाला आहे. दिवसभर प्रदर्शनस्थळी विद्यार्थ्यांची व पालकांचीही मोठी वर्दळ वाढू लागली आहे. येणारा प्रत्येकजण स्टॉलवर जावून माहिती घेत  घेवू लागला आहे.  त्यानंतर बरेचजण व्याख्यान हॉलमध्ये उपस्थिती लावून तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेताना पहायला मिळाले.