Fri, Feb 22, 2019 04:07होमपेज › Satara › माजी ग्रामपंचायत सदस्याकडून पिस्‍तुल जप्त

माजी ग्रामपंचायत सदस्याकडून पिस्‍तुल जप्त

Published On: May 24 2018 3:57PM | Last Updated: May 24 2018 3:57PMसातारा : प्रतिनिधी

शिवथर ता. सातारा येथे एका धाब्यावर दत्तात्रय प्रकाश जाधव (मूळ रा. मालगाव ता. सातारा, सध्या रा. वाठार स्टे. ता. कोरेगाव) याच्याकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गावठी पिस्टल जप्त केले. दरम्यान, संशयित हा माजी ग्रामपंचायत सदस्य असून, सध्या तो वडापाव विक्रीचा व्यवसाय करत आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, दत्तात्रय जाधव यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. आज गुरुवारी पोलिसांनी सापळा रचुन जाधव यांची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल सापडले. पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसने, पोलीस हवालदार विलास नागे, योगेश पोळ, संतोष जाधव, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, प्रवीण कडव, गणेश कचरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.