Wed, Nov 21, 2018 01:33होमपेज › Satara › फलटणमध्ये ट्रॅव्हल्सला अपघात दोघे जखमी

फलटणमध्ये ट्रॅव्हल्सला अपघात दोघे जखमी

Published On: Feb 22 2018 9:29AM | Last Updated: Feb 22 2018 9:29AMफलटण : प्रतिनिधी 

मुंबईहून आटपाडीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला वडजल (ता. फलटण) येथे भीषण अपघात झाला. त्यामध्ये दोन प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबईहून आटपाडीकडे जाणारी जे. डी. ट्रॅव्हल्स (एमएच ०७ एडी २१२१) ही वडजल ते वाठार फाटा येथे पहाटे सव्‍वा चार वाजता  पुलाच्या कठड्यास जोरदार धडकल्याने बस पलटी झाली. यामध्ये तीस प्रवासी होते.

वाचा : सातारा : जेवण आहे का? विचारत ढाबा मालकाचे अपहरण 

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी जखमींना रुग्णालयात  पाठवले. यामध्ये  संतोष पवार (वय ३६ रा. पवारवाडी वडूज, ता. खटाव) व एक महिला जखमी झाली आहे.

वाचा : लग्‍नादिवशीच अपघातात नवरदेवाचा मृत्यू