Sat, Jul 20, 2019 08:38होमपेज › Satara › सातारा  :  कुडाळमधून दहावीची मुलगी बेपत्ता 

सातारा  :  कुडाळमधून दहावीची मुलगी बेपत्ता 

Published On: Jul 08 2018 1:56PM | Last Updated: Jul 08 2018 2:04PMकुडाळ: प्रतिनिधी

कुडाळ ता. जावली येथील ज्योती नंदकुमार पवार (वय १६ ) ही दहावीची परीक्षा देवून ७७ टक्के गुण मिळवलेली विद्यार्थिनी रविवारी पहाटे राहते घरातून  बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबियांना मुलीची एक चिठ्ठी सापडली आहे. दहावीत ‘कमी गुण’ मिळाल्याने नैराश्यातून ती बेपत्ता झाली आहे. 

ज्योती पवार दहावीची परिक्षेत ७७  टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली,  निकाल लागल्यानंतर मात्र कमी गुण मिळाल्याने ती शांत होती. अशातच रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास उठली. आजीला  अंघोळीला पाणी दिल्यानंतर नळाचे पाणी भरते असे सांगून घराबाहेर आली. मात्र ती बराच वेळी परत न आल्याने कुटुंबियांच्या लक्षात आले.

ज्योतीचा शोध घेण्यास सुरुवात झाल्यानंतर कुटुंबियांना घरामध्ये ज्योतीने लिहलेली एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी वाचल्यानंतर पवार कुटुंबिय हादरुन गेले.  कुडाळ पोलिसांना कुटुंबियांनी घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी ज्योतीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.