Sun, Jul 21, 2019 12:43होमपेज › Satara › मालट्रक बंद पडल्याने खंबाटकी घाट जाम

मालट्रक बंद पडल्याने खंबाटकी घाट जाम

Published On: May 13 2018 2:18AM | Last Updated: May 12 2018 11:07PMखंडाळा : वार्ताहर 

खांबाटकी घाटात शनिवारी सकाळी मालट्रक रस्त्यातच बंद पडल्याने घाट जाम झाला होता. रस्त्याच्या  मधोमधच हा ट्रक असल्याने वाहने धिम्या गतीने पुढे जात होती. तर वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून काही वेळ सातारा बाजूकडे जाणारी वाहने घाटातूनवळवून बोगद्यामार्गे सोडण्यात आली. 

सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू आहे. त्यातच दुसरा शनिवार आणि लग्न व वास्तू शांतचा अखेरचा महूर्त असल्याने मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होते. त्यामुळे सकाळी सकाळीच नागरिक पुणे व कोल्हापूरच्या बाजूने निघाले होते. सुट्टी आणि त्यात शुभकार्य असल्याने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. सकाळी 9 वाजता घाटात रस्त्याच्या मधोमधच मालट्रक बंद पडला होता. मालट्रकची दुरूस्ती लवकर न झाल्याने वाहतूक धीमी झाली होती. महामार्गावर वाहनांची प्रचंड संख्या असल्याने घाटात वाहतूक ठप्प होऊ नये तसेच बंद पडलेला मालट्रक बाजूला काढण्यासाठी घाट मार्गावरील वाहतूक बोगदामार्गे वळवण्यात आली. 

खंडाळा पोलिसांनी बंद पडलेला मालद्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.हा मालट्रक बंद पडल्याने सुमारे तासभर वाहतूक बोगदामार्गे सुरू होती. त्यामुळे सकाळी 9 ते 12 या वेळेत घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

उन्हाळी सुट्यांचा हंगाम वास्तुशांत आणी लग्न समारंभासाठी नागरिक बाहेर पडल्याने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी वर्दळ वाढली होती. महामार्गावरील टोलनाक्यांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोल्हापूर व पुण्याकडे जाणार्‍या दोन्ही लेनवर गर्दी वाढली होती. टोलनाक्यावर पैसे भरून घेण्यास कर्मचारी वेळ लावत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र शनिवारी दिसले. त्यामुळे किरकोळ वादावादीचे प्रकार घडले.