Thu, Jul 18, 2019 02:47होमपेज › Satara › जुगाडू एडिटिंगमुळे फेसबुक किंग वाढले

जुगाडू एडिटिंगमुळे फेसबुक किंग वाढले

Published On: Feb 04 2018 11:22PM | Last Updated: Feb 04 2018 10:59PMसातारा : सुशांत पाटील

ओढून ताणून, एकमेकांना टॅग करुन सोशल मीडियावर मोकळ्यात हवा करणारे आजचे तरुण सध्या जुगाडू एडिंगचा फंडा वापरत आहेत. अंगविक्षीप्त पोझ देणे, वाकडेतिकडे तोंड करणे, एकमेकांच्या अंगावर बसणे, भर रस्त्यात आडवेतिडवे झोपणे तसेच नेते, सेलिब्रेटींबरोबर स्वत:चे फोटो जोडून राडा करणारे स्वयंघोषित फेसबुक किंगची संख्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आपला पूर्ण वेळ सोशल मीडियावरच कारणी लावून करिअरचे मात्र वाटोळे करणार्‍यांचे प्रमाण वाढत असून अशा पाल्यांवर पालकांनी सोशल अंकुश ठेवण्याची गरज आहे.

मोबाईल कधी काळी चैनीची असणारी वस्तू आज प्रत्येक घराघरात नाही तर प्रत्येकाच्या दोन्ही हातात दिसू लागली आहे. स्वस्तात मस्त असे मोबाईल मार्केटमध्ये उपलब्ध झाल्यामुळे आजची युवा पिढी मोबाईलच्या पूर्णंत: आहारी गेली आहे.  सर्वच प्रकारच्या अ‍ॅपवर अ‍ॅक्टीव्ह राहणारे आजचे युवा जगत वाकडेतिकडे तोंड करुन सोशल मीडियावर लाईक मिळवण्याच्या नादात आपली लाईफ बरबाद करत असल्याचे भयानक चित्र आज पहायला मिळत आहे.

मनुष्याने इंटरनेटचा शोध एकमेकांना कनेक्ट राहण्यासाठी लावला. मात्र आजची स्मार्ट पिढी या सोशल इंटरनेटच्या आहारी केवळ दोन, तीन तास नव्हे तर चोवीस तास कनेक्ट राहू लागली. मग फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस् अ‍ॅप यासारख्या अ‍ॅपवर ह्या मिसरुड न फुटलेल्या पोरांचे फोटो जास्तीत जास्त लाईक मिळण्यासाठीच पडत आहेत.

स्वस्तात उपलब्ध होणारे फोरजी नेटवर्क, चांगल्या  क्लॉलिटीचे स्मार्ट फोन, मोबाईलवरच उपलब्ध असलेले फोटो एडिटिंगचे  सॉफ्टवेअर याव्दारे  तरुणाई मोबाईलवरच हवे तसे फोटो बनवून  सोशल मीडियावर मोकळ्यात हवा करण्यात आजचे स्मार्ट तरुण व्यस्त आहेत.