Fri, Apr 26, 2019 17:19होमपेज › Satara › लाचप्रकरणी पाटणचे दोन पोलीस जाळ्यात

लाचप्रकरणी पाटणचे दोन पोलीस जाळ्यात

Published On: May 19 2018 4:14PM | Last Updated: May 19 2018 4:13PMसातारा: प्रतिनिधी

पाटण पोलीस ठाण्याचे दोन पोलीस हवालदार 2 हजार रुपयांची लाच घेताना सापडले असून, सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे. पोलीस हवालदार संजय राक्षे व कुलदीप कोळी अशी या दोघांची नावे आहेत. 

तक्रारदार यांना दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी एका पोलीसाने पैसे मागितले, पैसे घेताना मात्र दोघांचा समावेश असल्याने यावेळी दोघाना अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अवघ्या 2 हजार रूपयांसाठी एकाच पोलीस ठाण्यातील 2 पोलीस लाच घेताना सापडल्याने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.