Wed, Feb 26, 2020 21:28होमपेज › Satara › स्वच्छ सर्वेक्षणसाठी सीईओंचा 14 हजारी संदेश

स्वच्छ सर्वेक्षणसाठी सीईओंचा 14 हजारी संदेश

Published On: Sep 18 2019 1:44AM | Last Updated: Sep 17 2019 8:17PM

संग्रहित छायाचित्रसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्याला स्वच्छता सर्व्हेक्षण 2018 मध्ये देशातील  पहिला स्वच्छ जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदाही प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस, माध्यमिक व प्राथमिक शिक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकार्‍यांसह अन्य शासकीय कर्मचार्‍यांना मोबाईलवरून  सुमारे 14 हजार संदेश पाठवून  संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.

केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशातील सर्व जिल्ह्याचे गुणांकन करण्यासाठी गुणात्मक व संख्यात्मक निकषांच्या आधारे स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 हा देशव्यापी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील 29 गावांची निवड केंद्र शासनाने केली होती. या गावांची तपासणी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात आली. गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणांचे निरीक्षण,स्वच्छतेविषयी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांमध्ये स्वच्छतेबाबतची जागरूकता व अभिप्राय घेण्यात आले. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यासाठी  गावात केलेल्या सोयी सुविधासंदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रिया संबंधित यंत्रणेने घेतल.

जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी विभागाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 ची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी गटविकास अधिकारी, अंगवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस, माध्यमिक व प्राथमिक शिक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकार्‍यांसह अन्य शासकीय कर्मचार्‍यांना मोबाईलवरून  सुमारे 14 हजार जणांना  जिल्ह्यास स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 चा पहिला बहुमान मिळवून देवू आणि सातारा जिल्ह्याची स्वच्छतेची परंपरा कायम ठेवू.  हा मेसेज आपल्या नातेवाईक व मित्रमंडळींना पाठवण्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी फक्‍त दोन मिनीटे वेळ द्या, असे आवाहन केले आहे. तसेच रोज किती नागरिकांनी संबंधित लिंकवर अभिप्राय नोंदवला याची माहितीही घेतली जात आहे. गावोगावांतील नागरिक व शासकीय कर्मचारीही जिल्ह्याला पुन्हा एकदा स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 चा पहिला बहुमान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.