सातारा : प्रतिनिधी
धावडवाडी (ता. खंडाळा) येथील हायटेक कंपनीसमोर आंदोलन करणार्या महिलांना पोलिसांनी अटक केली होती. या महिलांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कैद राहू, असे सांगत थेट जामीनच नाकारला आहे. कंपनीच्या अन्यायकारक भूमिकेवर आम्हाला न्याय द्या. या पार्श्वभूमीवर या महिलांची कारागृहात या ठिकाणीसुद्धा आंदोलन सुरू असलेली माहिती पुढे येत आहे.
हायटेक कंपनीने अचानक कामावरून काढल्यामुळे महिलांना कंपनीच्या मॅनेजमेंटच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली होती. शुक्रवारी या 13 महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार होती. मात्र, आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही कैदेतच राहू, अशी भूमिका या महिलांनी घेतल्याने स्पष्टपणे जामीन नाकारला.
येथील महिला कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून लेबर काँन्ट्रक्ट व इतर कारणावरून वाद चालू आहे. हायटेक कंपनीच्या गेटवर 4 दिवसांपूर्वी कंपनीतील कामगार महिलांनी कामावरून काढून टाकल्यामुळे गेटवरच आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या व्यवस्थापकांनी कंपनीच्या कामात अडथळा करत असल्याची तक्रार करुन खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी महिलांना अटक केली होती. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयासमोर महिलांनी जामीन नाकरला असल्याची माहिती पुढे येत आहे. महिलांना न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत आम्हाला न्याय द्या, आम्हाला कामावरून काढून टाकले आहे.