Sat, Feb 23, 2019 18:30होमपेज › Satara › सातारा : राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीसंदर्भात आंदोलन

सातारा : राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीसंदर्भात आंदोलन

Published On: Aug 31 2018 5:11PM | Last Updated: Aug 31 2018 5:11PMशाहुपूरी : वार्ताहर

भाजप सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीसंदर्भात  घोषणाबाजी करत सातारा येथील रेणुका पेट्रोल पंपात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी पेट्रोल दरवाढीसंदर्भात पेंट्रोलपंपावर ग्राहकांना पेढे वाटून अनोखे अंदोलन करण्यात आले.

रेणुका पेट्रोल पंपासमोर दुपारी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध असो, वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त, अशा विविध घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तसेच विविध घोषवाक्य लिहिलेले फलक आंदोलनाचे लक्ष वेधुन घेत होते.

केंद्रात  व राज्यात भाजपा शिवसेना सरकार येवून चार वर्षाच्या कालावधी झाला. हे शासन कुठल्याच बाबतीत सर्वसामान्य जनतेला न्याय देत नसल्याने विकासाच्या बाबतीत होणार्‍या जाहिरातीमध्ये सतत दाखवल्या जाणार्‍या खोट्या आकडेवारीमुळे सत्ताधार्‍यावर जनता नाराज आहे.  सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढीसंदर्भात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी असताना दर कमी आकारणे आवश्‌यक  होते. 

 या शासनाने देशात दर कमी केले नाहीत. उलट बाहेर भाववाढ झाल्यानंतर देशात रितसर दरवाढ सुरूच ठेवली. जनक्षोभ भडकल्यानंतर दर कमी करणार का? असा सवाल पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला. यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदन देण्यात आले.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुधीर धुमाळ, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, अतुल शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा समिंद्रा जाधव उपस्‍थित होत्‍या.