Mon, Aug 19, 2019 01:42होमपेज › Satara › महिला शिक्षकांसाठी 354 शाळा अडचणीच्या

महिला शिक्षकांसाठी 354 शाळा अडचणीच्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रविण शिंगटे

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या गतवर्षापासून ऑनलाईन करण्याचा घाट राज्याच्या ग्रामविकास विभागाने घातल्याने गतवर्षी बदल्या झाल्याच नाही. मात्र, फेब्रुवारीमध्ये अतिदुर्गम भागात महिलांना बदलीपासून सूट देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 423 दुर्गम शाळांपैकी 354 शाळा महिलांना येण्या-जाण्यासाठी असुरक्षित घोषित करण्यात आल्या आहेत. परिणामी या शाळांमधून आता त्यांची सुटका होणार आहे. 

राज्याच्या ग्राम विकास विभागाने ज्या शाळा अत्यंत प्रतिकूल व अतिदुर्गम भागात आहेत, अशा शाळांचा सर्व्हे करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील  423 दुर्गम प्राथमिक शाळांचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी 354 शाळा महिलांना येण्या-जाण्यासाठी अडचणीच्या ठरणार आहेत. जिल्ह्यात सुमारे 2 हजार 703 शाळा असून 3 हजार 645 महिला शिक्षिका आहेत. दुर्गम 423 शाळांपैकी महिलांसाठी 354 शाळा प्रतिकूल असून  69 शाळा जाण्या-येण्यासाठी अनुकूल आहेत.

   पाटण तालुका - केळेवाडीवरची, शिंगमोडेवाडी, विठ्ठलवाडी, नेहरूटेकडी रूवले, पाटीलवाडी, धाजगाव, जंगमवाडी धाजगाव, अंब्रुळ करवडी, जंगलवाडी चाफळ,  बोर्गेवाडी घोट,  अरल चाफोली पाटण, धईलवाडी, जोगेटेक, खुडुपलेवाडी, धनगरवस्ती खुडूपलेवाडी, धनगरवाडी कारवट, किसरूळे ढाणकल, बावीचावाडा, चाफवाचा खडक, चिरंबे हेळवाक, कोळणे, पाथरपुंज, मळे, नाव, मेंढेघर कदमवाडी,  जिमणवाडी, बागलेवाडी, भोकरवाडी,  केंजळवाडी, डफळवाडी, जांभेकरवाडी, बहिरेवाडी, जन्नेवाडी पाटण, केराळे, नवीवसाहत, भटाडेवाडी, सातर, म्हाळुंगेवाडी सातर, मोडकवाडी, धनावडेवाडी, निगडे, टेटमेवाडी काळगाव,  करपेवाडी काळगाव,  धनगरवाडा, डाकेवाडी काळगाव, चोरगेवाडी, मस्करवाडी काळगाव, पिराजीवाडी हुंबरळी, मरडवाडी, धनगरवाडा मरड, भिकाडी, पलासरी, रामेर, अवसरी, भारसाखळे, जवारतवाडी, जांभूळवन,

पाथवडे, सडा दुसाळे, तावरेवाडी, नारळवाडी, पाडळोशी, मसुगडेवाडी, लुगडेवाडी, निवकणे महा, पांढरेपाणी, पाचगणी, बहेदिक्षी, धनगरवाडी कोकिसरे, हुबंरणे, आटोळी, नागवणटेक आटोळे, गाडखोप, बाजेवरसरकून, नाणेल, धनगरवस्ती नाणेल, पाल्याचावाडा, गोकूळ तर्फ  हेळवाक, ऐनाचीवाडी, तोरणे, शिवंदेघर, दाबाचामळा, वाजेगाव नाणेल, बामणवाडी, वरेकरवाडी, शिबेवाडी वरची, पानेरी,  धावडवडा पानेरी, वाल्मिवाडा पानेरी, तामिणे, पळाशी, सुद्रुपेवाडी,  वर्पेवाडी,  बोर्गेवाडी सळवे, मान्याचीवाडी सळवे,  सावंतवाडी पळशी, पुनवली ढोकवले, मुसलमानवस्ती चाफेर,  गोठणे,  रिसवड,

शितपवाडी, यादववाडी मुरूड खु, बाजे,  गुणुकलेवाडी, विठ्ठलवाडी, रोमणवाडी, रामाचावडा येराड, घेरादातेगड, मात्रेवाडी, धनगरवाडी कासानी, निनाईवाडी कासानी,  कासानी, सतीचीवाडी कासानी,  निवी,  बौध्दवस्ती निवी, सलतेवाडी, डाकेवाडीवरची, बोरगेवाडी, गोजेगाव बोंड्री, टोळेवाडी, वरपेवाडी गोकूळ, बामणेवाडी, पेडेकरवाडी, डोणी, घाटेवाडी, सडानिनाई, चव्हाणवाडी, कदमवाडी नाटोशी, कालकेवाडी, मोगरवाडी, कोळेकरवाडी, माईगडेवाडी,  हौदाचीवाडी जिंती,  मेंढ, घोटील नं1, खबालवाडी,  गनेवाडी, तांबेवाडी, सडा दाढोली, कोचरेवाडी, कोळेकरवाडी वागजाईवाडी, बहिरेवाडी अशा141 शाळा आहेत. 

   जावली तालुक्यातील कोळघर, उंबरी चोरगे, उंबरीवाडी, अंबवडे, पिसाडी, कात्रेवाडी,  वेळेढेण, तळदेव मायणी, पावशेवाडी, खिरखिंडी, शेंबडी, मुनावळे, तेटलीमुरा, घोटेघर, कुंभारगणी, धनगरवाडी दरे, रेंडीमुरा, मोळेश्‍वर, एकीव, दुंद मुरा, कुसुंबी मुरा, गेळदरे, घरातघर, पाटणेमाची, सांगवी मुरा, शिंदेवस्ती (गांजे), आखेगणी,  हातगेघर मुरा, सायघर, वाटंबे, भुतेघर, बोंडारवाडी, मुकवली, वाहिटे, गाढवली पुन., भोगवली मुरा, खिलारमुरा, रेंगडीमुरा, धनगरवस्ती म., धनगरवस्ती, नरफदेव, मरडमुरे, भामघर,  म्हातेमुरा, गाळदेव, आपटी, ढेबेवस्ती आपटी, शिवाजीवाडी (आपटी), बौध्दवस्ती आ., फुरूस, निपाणी, वाकी, हातरेवाडी, मांटीमुरा, केळघर सोळशी, निपाणीमुरा, गुजरवाडी, सांगवी तर्फ कुडाळ,  पानस पुन. अशा 59 शाळा प्रतिकूल आहेत.

   महाबळेश्‍वर तालुक्यातील  पांगारी, दानवली, बिरमणी, आरव, रूळे, गावढोशी, गावढोशी मुरा, खरोशी, दाभे-दाभेकर, शिरनार, रेणोशी, दाभेमोहन, लामज,  लामज मुरा, आकल्पे, आकल्पे मुरा,  निवळी, पर्वत, वाघावळे,  सालोशी, कांदाटबन, उचाट, नावली, आढाळ,  धारदेव, एरंडल, मालुसर 1, घावरी, विवर, कोंडोशी, दुधोशी, दरे, शिंदी, वलवण, म्हाळुंगे, झांजवड,  कासरूड,  दुधगांव, चतुरबेट, कळमगाव, घोणसपूर, शिरवली, गोरोशी, बिरवाडी, वाळणे, आवळण,  अहिर, अहिरमुरा, गाढवली, दरेतांब, पिंपरीतांब, वानवली अहिर,  वारसोळी कोळी, वेळापूर, वानवली उत्तेकर, कळमगाव, कोट्रोशी,  आमशी, लाखवड, रामेघर, वारसाळी देव, येरणे बु., आचली, देवसरे, सौंदरी,  सोनाट, कुरोशी, खांबिल पोकळे, खांबिल चोरगे,  वेंगळे, वेंगळेवरचीवाडी अशा 73 शाळा आहेत.


 खंडाळा तालुक्यातील ठोंबरेवस्ती पडळकरवस्ती, दगडेवस्ती, अहिल्यानगर, रूई, तरवडी (शिंदेवस्ती), पानमळा, निकमवस्ती, मांगदरा, चाहूरवस्ती, लिंबाचीवाडी, झगलवाडी 11 शाळा प्रतिकूल आहेत.
कोरेगाव तालुक्यातील  चवणेश्‍वर. 

खटाव तालुक्यातील  कठरेवाडी, हनुमाननगर( चितळी), शिंदेमळा (चितळी), गिरीजाशंकरवाडी, बरकडेवस्ती अशा 5 शाळा आहेत. कराड तालुक्यातील  लटकेवाडी, मस्करवाडी, साखरवाडी,काजारवाडी, माटेरवाडी, मुळीवाडी, मूटलवाडी, भगतवाडी, पाठरवाडी अशा 9 शाळा आहेत. 


वाई तालुक्यातील  ओहळी, पाकिरेवस्ती, अनपटवाडी, धनगरवाडी, पालाना, बालेघर, सोमेश्‍वरवाडी,  वेरूळी, पाराटवस्ती, देवरूखवाडी, माडगणी, तुपेवाडी, किरोंडे, गोळेवाडी, दत्तवाडी, रवाडी,धनगरवस्ती अशा 17 शाळा आहेत.

   सातारा तालुक्यातील बेंडवाडी, बोंडारवाडी, मोरबाग, पिरेवाडी, टोळेवाडी, आलवडी,  भांबवली, केळवली, धावली,  जळकेवाडी, वांजुळवाडी, जुंगटी, कासाणी, पळसावडे, रेंवडे,  जांभळेघर, जगमीन, मालदेववस्ती अशा 18 शाळा आहेत.
 

 

 

tags : satara,news,354, school, difficulties,female, teachers,


  •