Tue, Apr 23, 2019 06:32होमपेज › Satara › तेरा मटकाकिंग तडीपार

तेरा मटकाकिंग तडीपार

Published On: Mar 06 2018 10:46PM | Last Updated: Mar 06 2018 10:39PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहर व परिसरातील ठिकठिकाणी मटका, जुगार अड्डा चालवणार्‍या 13 जणांना सातारा जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनी 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे.  त्यामुळे सातार्‍यातील अवैध  धंदेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे. तडीपार केलेली समीर कच्छी याची टोळी असून पोलिस अधीक्षकांनी केलेल्या दणकेबाज कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. 

समीर सलीम कच्छी याच्यासह टोळीतील प्रभाकर बलदेव मिश्रा, सुनील अनिल कुंभार, अकबर हुसेन शेख, रमेश दिनकर जावलीकर, मंगेश जगन्‍नाथ जगताप, जमीर गणीभाई शेख, अरुण रामचंद्र माने, वसीम इब्राहिम शेख, किरण शिवाण्णा शेट्टी, सलीम बाबुलाल पठाण, अरुण भगवान शिंदे, अमृत विलास खांडेकर (सर्व राहणार सातारा शहर परिसर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. संशयितांना जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. 

संशयित सर्व समीर कच्छी याच्यासाठी मटका व जुगार अड्डा चालण्याचे काम करत होते. पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. अटकेसारखी कारवाई करून त्यांना सुधारण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र, संशयित जुगार व मटका अड्डा  चालवत होते. मटका बहाद्दरावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार पोलिसांनी संशयितांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे सादर केला. मंगळवारी रात्री या प्रकरणी तडीपारी करत असल्याची घोषणा करून दोन दिवसांच्या आत संशयितांवर कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.