Mon, Apr 22, 2019 15:41होमपेज › Satara › 'आ. शंभूराज देसाई यांच्या पाठीशी रहा'

'आ. शंभूराज देसाई यांच्या पाठीशी रहा'

Published On: Mar 22 2018 10:41PM | Last Updated: Mar 22 2018 10:10PMसणबूर : वार्ताहर

आ. शंभूराज देसाई पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. शासनाच्या माध्यमातून कोटयवधी रुपयांचा निधी पाटण मतदारसंघातील विविध विकासकामांना ते आणत आहेत. आज त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लागत आहेत. त्यांच्या पाठीशी मतदारसंघातील जनतेने ठाम उभे रहावे, असे आवाहन युवा नेते यशराज देसाई यांनी केले.

निवडे पुनर्वसित गावठाण ता. पाटण येथील अंतर्गत रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन अ‍ॅड.मिलिंद पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी संचालक बबनराव शिंदे, संचालक सोमनाथ खामकर, गजानन जाधव, शिवदौलत संचालक अभिजीत पाटील, विजय पवार, माणिक पवार, तारळे सरपंच सौ.खांडके, उपसरपंच राजू नलवडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

यशराज देसाई म्हणाले, दिलेल्या जाहिरनाम्यातील वचन नाम्याची पुर्तता करण्यावर देसाईसाहेबांनी गत तीन वर्षात भर दिला आहे. विकासापासून वंचित राहिलेल्या गावांचा अनुशेष भरुन काढणेसाठी त्यांनी आपली राजकीय ताकत पणाला लावली आहे.

विकास कामांसाठी  आवश्यक असणारा निधी ते मतदार संघात आणत आहेत. गत तीन वर्षात कोट्यवधीचा  निधी आ. देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघात आणली आहेत. त्यांच्या विशेष प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती व जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजना अशा विविध योजनेअंतर्गत त्यांनी शासनाकडून निधी आणला आहे. स्वागत बबनराव शिंदे यांनी केले.