Mon, Mar 25, 2019 04:56
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › मानेवर बसून काम करणारा खमक्या आमदार

मानेवर बसून काम करणारा खमक्या आमदार

Published On: Apr 24 2018 10:30PM | Last Updated: Apr 24 2018 8:19PMसणबूर : तुषार देशमुख

वांग- मराठवाडी धरणग्रस्थांच्या पूनर्वसनाचा प्रश्‍न सातत्याने प्रयत्न करून  निकाली काढल्याने आ. शंभूराज देसाई यांच्या पाठीवर महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी शाब्बासकीची थाप टाकली. ‘इतर आमदार कामासाठी मंत्रीमहोदयांच्या मागे लागतात परंतू आ. देसाई हे मानेवर बसून काम करून घेणारा खमक्या आमदार आहे, अशा शब्दात त्यांनी आ. देसाई यांच्या कामाचे कौतुक केले. 
युतीचे सरकार 19 मे 1997 साली सत्तेत आल्यावर मोठ्या धूमधडाक्यात वांग मराठवाडी धरणाचे भूमी पूजन झाले. तेंव्हापासून तब्बल एकवीस वर्षे धरणग्रस्थांच्या पुनर्वसनासाठी आ. देसाई यांनी अथक प्रयत्न केले. मोर्चे, अंदोलने केली कृष्णाखोर्‍याचे अधिकारी, पूनर्वसन खाते जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठका घेवून धरणग्रस्थांच्या न्यायहक्कासाठी पक्षीय राजकारणाला मुठमाती देऊन प्रचंड संघर्ष करत न्याय मिळवून दिला.सुरूवातीपासूनच शंभूराज देसाई यांची भूमिका ही आधि पुनर्वसन मग धरण अशीच होती. सत्ता कोणाचीही असो आ. देसाई यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने त्याचा फायदा नेहमीच तालुक्यातील जनतेला झाला आहे.

2004 साली शंभूराज देसाई पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर धरणग्रस्तांच्या प्रश्‍नावर विधानसभा दणाणून सोडली. वांग मराठवाडी, तारळी, मोरणा-गुरेघर असे तीन प्रकल्प माझ्या तालुक्यात असून जिल्ह्यात सर्वाधिक धरणे पाटण तालुक्यात आहेत. शिवाय कोयना प्रकल्पग्रस्तांचा  पुनर्वसनाचा प्रश्‍न कित्येक वर्ष प्रलंबित राहिल्याने तो फारच जटील झाला आहे. हे सर्व प्रश्‍न तातडीने सोडवण्यासाठी सतत शासनाशी दोन हात करून राज्यकर्त्यांना जेरीस आणले. 

तात्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण यांना पाटण तालुक्यात आणून तालूक्यातील समस्यांचा पाढा वाचला. त्यानंतर क्लीन चेहरा म्हणून पाटण तालुक्याचे सुपूत्र आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले. आ.देसाई यांनी बाबांनादेखील कारखाना स्थळावर आणून तालुक्यातील धरणग्रस्तांची परवड निदर्शनास आणून दिली. मराठवाडी, तारळी , मोरणागुरेघर येथील प्रकल्पग्रस्थांची बाबांच्या सोबत बैठका लावल्या. यावर बाबांनी पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन आ. देसाई यांना दिले. परंतू काही प्रमाणात पूनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लागला. दरम्यानच्या काळात सरकार बदलले आघाडीचे सरकार जावून पुन्हा युतीचे सरकार आले. आणि शंभूराज देसाईनां तालुक्यातील जणतेने पून्हा आमदार केले. स्वत:च्या पक्षाचे सरकार आसल्याने आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने मित्राकडून धरणग्रस्तांच्या पूनर्वसनाचा प्रश्‍न सोडवणे आ. देसाईंना अधिक सोपे झाले. काही समस्या चर्चेने सोडवल्या तर काही समस्यासाठी आ. देसाई विधानसभेत आक्रमक झाले. प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी वांग मरठवाडीच्या पुनर्वसन प्रश्‍नावर सरकारने जलाशयाच्या वरसरकुन गावठाण विकसित करून तिथे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आणि निधींची तरतूद केली. यामध्ये महसूल तथा मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. देसाई यांना चांगलीच मदत केली. आ.देसाईचा धरणग्रस्तांच्या प्रश्‍नावर खोलवर अभ्यास असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयातील बैठकांपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांची मुद्देसूद मांडणी करून यातील दाहकता राज्यशासनाच्या लक्षात आणून दिली.शासनाच्या मानेवर बसून अनेक प्रस्ताव मंजूर करून घेतल्याचे ना. चंद्रकांतदादांनी सांगितले. एकूणच आ. शंभूराज देसाई यांनी गेल्या एकवीस वर्षापासून दिलेल्या लढ्याला अखेर यश आले. वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांना जलाशयाच्या वरसरकून गावठाण विकसित करून देण्याचे मान्य करून प्रत्यक्षात  कामाला सुरूवात केली. रोख रकमेचे धनादेश वाटण्याचे कामदेखील ना. चंद्रकांत पाटील, भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, आ. देसाई, आ. नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. हा ऐतीहासीक निर्णय करूण घेण्यात आ. देसाई यांना आलेल्या यशाबद्दल धरणग्रस्तांच्या चेहर्‍यावर आनंद ओसांडून वाहत होता. अशा लढवया आमदारांना येथील धरणग्रस्त धन्यवाद देत आहेत.