Sun, Aug 25, 2019 08:14होमपेज › Satara › थेंबभरही पाणी देणार नाही

थेंबभरही पाणी देणार नाही

Published On: Mar 22 2018 10:41PM | Last Updated: Mar 22 2018 10:12PMसणबूर : वार्ताहर

साखरी धरणाखालील प्रलंबित कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत धरणातील एक थेंब पाणी धरणाबाहेर सोडून देणार नाही, असा इशारा काळगांव येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आ. शंभूराज देसाई यांच्या जनता दरबारामध्ये पं. स. सदस्य पंजाबराव देसाई यांनी साखरी धरणाखालील चार केटीवेअर बंधार्‍याचे पाया काढून काम सुरू केले होते. परंतू नंतर ते बंद केले असलेचे निदर्शनास आल्यावर  दिले आ. देसाई यांनी तत्काळ ठेकेदार बदलून कामे सुरू करण्याच्या सुचना कृष्णाखोर्‍याच्या अधिकार्‍यांना दिल्या. परंतू अद्याप देखील या खात्याचा अधिकारी वर्ग सुस्त असलेने शेवटी येथील प्रकल्पग्रस्तांनी धरणातील  पाणी सोडण्यास विरोध केला.

प्रकल्पग्रस्त आणि  कृष्णाखोरेच्या अधिकारी यांच्यामध्ये अनेकवेळा बैठका   झाल्या. यामध्ये कृष्णाखोरेच्यावतीने अनेक आश्‍वासने देण्यात आली. अलीकडे 22 महिन्यापूर्वी दिलेल्या आश्‍वासनात प्रलंबीत कामे करून देतो असे लेखी आश्‍वासन देवून ते देखील या अधिकार्‍यांनी पाळले नाही.

 निवेदनात म्हटलेे आहे की, येथील धरणाच्या सांडव्याची खुदाई ज्या शेतकर्‍यांच्या शेतातून केली आहे त्या शेतकर्‍यांच्या जमिनींचे रितसर मोजणी केलेली नाही, धरणाच्या बँकवॉटरकडे रींगरोड तयार केलेला नसलेने शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय हा रींगरोड 2.5 की.मी. चा आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र 1240 मीटर रोडचे इस्टीमेंट केले आहे. तसेच धरणाची जॅकवेल सिस्टीम देखील दुरुस्त केलेली नाही यासह अनेक प्रलंबीत कामे पूर्ण केल्याशिवाय धरणातील एक थेंब देखील धरणाबाहेर जावू देणार नाही असा इशारा येथील प्रकल्पग्रस्तांनी दिला असल्याचे निवेदन  आ. शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी सातारा,तहसीलदार पाटण,प्रांत कार्यालय पाटण, कृष्णाखोरे सातारा, जिल्हा पुनर्वसन सातारा यांना दिले आहे. 

निवेदनावर राजू काळे, भास्कळ काळे, वामनराव काळे, भरत दूधडे, गोविंद गोटूगडे,उत्तम मानसुकरे सरपंच जयवंत देसाई यांच्यासह पन्नास प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.