Fri, Aug 23, 2019 15:00होमपेज › Satara › घराच्या आगीत ५ जनावरे मृत्युमुखी

घराच्या आगीत ५ जनावरे मृत्युमुखी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सणबूर : वार्ताहर

वाल्मिक पठारावरील घोटील (ता. पाटण) येथे शॉर्टसर्किटने घराला लागलेल्या आगीत पाच जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. 31 तोळे सोने, 5 लाख वीस हजार रुपये रोख व संसार उपयोगी साहित्य, धान्य जळून सुमारे 20 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या आगीमुळे चार कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. 

कुटुंब मोठे असल्याने मारुती पवार यांनी आपले बंधू श्रीरंग पवार, राजाराम पवार, तानाजी पवार यांना एकत्र घेऊन दहा खणी घर बांधले आहे. सोमवारी रात्री घराला शॉर्ट सर्किटने आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. घरात  25 लोक  होते. आग बघून घरातील लोक बाहेर पळाले. घरातील गोठ्यातील 15 पैकी 10 जनावरांनी बाहेर पळ काढला. 5 जनावरे उलटी घरात घुसल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यामध्ये दोन म्हैशी, दोन वासरु, एका खोंड होते. 

पाच तासानंतर आग अटोक्यात आली. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार अंकुश राजाराम पवार यांचे जनावरांचे शेड जळून 25  हजाराचे नुकसान झाले आहे. तानाजी पवार यांचे 4 तोळे सोने, 40 हजार रुपये रोख व इतर साहित्य असे  2 लाख 95  हजाराचे नुकसान झाले  आहे. तर मारुती पवार यांचे 11 तोळे सोने, एक लाख पन्नास  हजार रोख  एक म्हौस व रेडी असे 7 लाख 90 हजार,श्रीरंग पवार यांचे चार तोळे सोने, रोख 90 हजार रुपये व इत्तर साहित्य 2 लाख  चाळीस हजाराचे नुकसान झाले आहे.   महादेव पवार यांचे  8 तोळे तोळे सोने, रोख 80 हजार व साहित्य मिळून 2 लाख 40 हजाराचे नुकसान झाले आहे. मंडल अधिकारी प्रविण शिंदे व गावकामगार तलाठी अमोल चव्हाण यांनी पंचनामा केला.