Mon, Feb 18, 2019 01:19होमपेज › Satara › तळबीडमध्ये इतिहास आजही डोळ्यासमोर

तळबीडमध्ये इतिहास आजही डोळ्यासमोर

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 8:58PMतासवडे टोलनाका : प्रवीण माळी 

कराडपासून 13  किलोमीटर अतंरावर पुणे - बंगळूर महामार्गापासून  तीन किलोमीटरवर वसंतगडाच्या पायथ्याशी वसलेल्या तळबीड गावात  हिंदवी स्वराज्याचे चौथे सरसेनापतीं  हंबीरराव मोहिते यांची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज ह्या दोघांचाही राज्यभिषेक सरसेनापती हंबीरराव मोहिते सरसेनापती असतानाच झाला होता. 

शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे जेव्हा आदिलशाहीत सरदार होते. त्यावेळी निजामाने त्यांच्यावर हल्ला केला. त्याप्रसंगी संभाजीराव मोहिते यांनी त्यांना साथ दिली आणि आक्रमक परतवून लावले. त्यावेळी मोहिते यांना तळबीडची देशमुखी देण्यात आली. 

याच संभाजी मोहिते यांचे सुपूत्र हंबीरराव मोहिते. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबरोबर निष्ठापूर्वक आणि सातत्याने सावलीसारखे ते पाठिशी राहिले. अदिलशाही सरदार सर्जाखानबरोबर वाई येथील युध्दात स्वराज्याच्या सैन्याची सरशी झाली. पण याच युद्धात सरसेनापतींना वीरमरण आलेे. मराठयांचा गौरवशाली इतिहास त्यामुळेच तळबीडमध्ये आल्यावर  आपल्या डोळ्यासमोर येतो.