Thu, Apr 25, 2019 16:23होमपेज › Satara › सज्जनगडावर समाधी मंदिरासमोरील कासवाची तोडफोड

सज्जनगडावर समाधी मंदिरासमोरील कासवाची तोडफोड

Published On: Jan 11 2018 11:33PM | Last Updated: Jan 11 2018 11:32PM

बुकमार्क करा
परळी: प्रतिनिधी

सज्जनगडावर बुधवारी रात्री अज्ञातांकडून दहशत माजवून मुख्य समाधी मंदिरासमोरील असणाऱ्या पितळ आणि पंचधातुच्या कासवाची तोडफोड करण्यात आली आहे. या कासवाचे धातूचे दोन पाय लंपास करण्यात आले आहेत. तसेच समाधी मंदिर पाठीमागे असलेल्या धाब्याच्या मारुती मंदिर रस्त्यावर असणाऱ्या ट्यूबलाईटचीही तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना निदर्शनास आल्यावर समर्थभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी मंदिर परिसरात गुरुवारी रात्री एक अज्ञात खूप काळ दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर त्याने रात्री उशिरा समोर असणाऱ्या पितळ आणि पंचधातुच्या कासवाची तोडफोड करून त्याचे मागील दोन पाय चोरून नेहले आहेत. त्यानंतर या अज्ञाताने समाधी मंदिर पाठीमागे असणाऱ्या धाब्याचा मारुती मंदिर रस्त्यावरील ट्यूबलाईट तोडून टाकल्या आहेत. यावरच समाधानी न राहता त्याने परिसरात असनाऱ्या गटारांची तोडफोड केली. सदर घटना पहाटे येणाऱ्या समर्थभक्त, ग्रामस्थ यांच्या निदर्शनास आली. यामुळे सज्जनगडावरील रहिवासी, समर्थ सेवा मंडळ, रामदास स्वामी संस्थान यांच्यासह परळी परिसरात संतापाची लाट व्यक्त होत आहे.

सदर घडलेला प्रकार खूप निंदनीय असून यामुळे समस्त समर्थ भक्ताच्या भावना दुखावल्या आहेत. ज्याने कृत्य केलेय त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली पाहिजे, असे समर्थ रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष भुषण स्वामी म्हणाले.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी अंगलाई देवी मंदिराचा दरवाजा तोडून त्यातील काही साड्या समोरील तटावर जाळण्याचा प्रताप ही याच अज्ञाताने केला असल्याची चर्चा परिसरात होती. सदर घटनेची नोंद अद्याप सातारा पोलीस ठाण्यात झाली नाही.