Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Satara › स्वच्छ मायणीसाठी सहकार्य करा 

स्वच्छ मायणीसाठी सहकार्य करा 

Published On: Dec 20 2017 1:45AM | Last Updated: Dec 19 2017 9:13PM

बुकमार्क करा

मायणी :डॉ. दिलीप येळगावकर

मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेची वीज बिलाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीचा प्रतिमहिना सुमारे साडे आकरा लाख रुपये हप्ता आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पाणीपट्टी व घरपट्टी तातडीने भरावी. ग्रामिण विकास कार्यक्रमांतर्गत  स्वच्छ मायणी स्वयंपूर्ण मायणी करण्याचा आमचा मानस असल्याचे माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले, तालुक्यातील ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. मात्र, आजपर्यंत कोणताही विकास या गावचा झाला नाही.

सन 2017-18या काळातील जलसंधारणाची कामे न झाल्यामुळे  96 लाख रुपयांचा निधी  अखर्चित असून   100 दिवसात सर्व निधी खर्च करणे अवघड आहे  तो निधी परत जाण्याची भिती तर आहेच पण 2018- 19 जलयुक्त शिवार गावांच्या यादीत गावच्या समावेशाबद्दलही अडथळे येऊ   शकतात. या अंर्तगत गावातील मुख्य पंढरपूर-मल्हारपेठ राज्यमार्गावरील सांडपाण्याची गटारे भुमिगत करणे व याच मार्गावरील गावाच्या पूर्व व पश्‍चिम बाजूस असणार्‍या दोन्ही पुलांची दुरुस्ती करुन त्यास संरक्षण कठडे तयार करण्याबरोबर सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्प, ओला सुका कचरा   विलगीकरण प्रकल्प, नव्याने तंटामुक्ती समितीची स्थापना करणे या कामांना प्राधान्य दिले जाईल.

सरपंच सचिन गुदगे म्हणाले,  गावातील मुख्य नळपाणी योजनेच्या पाईपची गळती काढण्याचे काम निधी नसतानाही आज 50 टक्के पूर्ण झाले आहे. आगामी एका महिन्यामध्ये गावातील  शंभर  टक्के  गळती  बंद होईल. ग्रामसेवक गावात वेळेवर येत नसल्याने अनेक  कामे रखडत आहेत.  उपसरपंच सुरज पाटील यांचे भाषण झाले. यावेळी शिवाजी पाटील, विजय कवडे, जालिंदर माळी, दत्तात्रय थोरात उपस्थित होते.