Fri, Nov 16, 2018 08:44होमपेज › Satara › कराड : बिल्डरचे कार्यालय फोडून सहा लाख लंपास

कराड : बिल्डरचे कार्यालय फोडून सहा लाख लंपास

Published On: Jul 01 2018 1:21PM | Last Updated: Jul 01 2018 1:21PMकराड : प्रतिनिधी

मलकापूर तालुका कराड येथे बिल्डरचे कार्यालय चोरट्यांनी फोडले. कार्यालयातील सुमारे सहा लाखांची रोकड त्यांनी लंपास केली. ही घटना काल रात्री घडली. कार्यालयाच्या शटरचे कुलूप उचकटून चोरट्यांनी रोख रकमेवर डल्ला मारला. या घटनेमुळे मलकापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दत्तात्रय हणमंतराव देसाई हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी वाळू विक्रीतून जमा झालेली रक्कम, मजुरांची दैनंदिन कामाची मजुरी, बिल्डिंगचे साहित्य खरेदी केलेले पैसे देण्यासाठी, तसेच उसनवारी घेतलेले पैसे आणले होते.एकूण 5 लाख 90 हजार एवढी रक्कम दत्तात्रय देसाई यांनी कार्यालयात आणून ठेवली होती. ही रक्कम चोरट्यांनी पळवली.

याबाबत देसाई यांनी  शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान पोलिसांनी ठसेतज्ञ व श्वान पथकासह घटनास्थळी भेट दिली.