Mon, Nov 19, 2018 06:54होमपेज › Satara › सातारा : महाबळेश्वरमधील तीन पत संस्थावर दरोडा

सातारा : महाबळेश्वरमधील तीन पत संस्थावर दरोडा

Published On: Jul 14 2018 12:54PM | Last Updated: Jul 14 2018 1:44PMमहाबळेश्वर : वार्ताहर 

शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात आणि पोलिस वसाहतीजवळ असणाऱ्या महात्मा फुले मार्केटमधील रात्रीच्या अंधारात धुके व पावसाचा फायदा घेत तीन पतसंस्थांवर शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजता दरोडा पडला. या दरोड्यात दोन चोरट्यांनी चार लाख रुपयांची रोकड लांबवली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 

येथील जनता नागरी सहकारी पतसंस्था गोटेनीरा जननी माता बिगरशेती सहकारी पतसंस्था व  साई नागरी सहकारी पतसंस्थेचा या तीन पतसंस्थांचा यामध्ये समावेश असून सीसीटीव्हीमध्ये दोन चोर हातामध्ये ब्लेड व बॅटरी घेत चेहऱ्याला रुमाल गुंडाळ्याचे दिसत आहे. त्यांच्या हातामध्ये एक्साब्लेड दिसून आले आहे. तीनही पतसंस्थांचे कुलूप कापून, फोडून चोरी झाली आहे. यामधील जनता नागरी सहकारी पतसंस्था, गोटेनिरा जननीमाता बिगरशेती सहकारी पतसंस्थातील रोकड लांबवली तर साई नागरी पतसंस्थेत मात्र काहीच हाताशी न आल्याने फक्त कागदपत्रे इत्यादी वस्तू पसरल्या आहेत. पोलिसांनी श्वान पथकांसह ठसे तज्ज्ञांना पाचारण केले असून प्रथमच महाबळेश्वरमध्ये घडलेल्या घटनेची शहरात चर्चा सुरु आहे.