Thu, Jul 18, 2019 21:24होमपेज › Satara › फलटणमध्ये ट्रक-दुचाकीच्या धडकेत एक ठार

फलटणमध्ये ट्रक-दुचाकीच्या धडकेत एक ठार

Published On: Feb 06 2018 8:49PM | Last Updated: Feb 06 2018 9:12PMफलटण :  प्रतिनिधी 

क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये एकजण  जागीच ठार  झाल्याची घटना घडली आहे.

अपघातात ठार झालेल्या मृत व्यक्तीचे नाव सचिन खोमने ( वय २८ ) आहे. तो उमाजी नाईक चौक फलटण येथील आहे. ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला आहे. अधिक तपास फलटण पोलिस करत आहेत.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार,  पंढरपूरकडे जाणाऱ्या कॅनॉलच्या पुलावर ट्रकचा व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अद्याप सदर व्यक्तीची ओळख पटली नसून पुढील तपास पोलिस करत आहेत.