होमपेज › Satara › तारखेतील बदलाने मतदानाचा मार्ग मोकळा

तारखेतील बदलाने मतदानाचा मार्ग मोकळा

Published On: Feb 12 2018 2:07AM | Last Updated: Feb 11 2018 10:46PMरेठरे बु  ;  प्रतिनिधी

औरंगाबाद  येथे मुस्लिम  समाजाचा दि.25 व 26 फेबु्रवारी रोजी धार्मिक कार्यक्रम होत आहे. याच दरम्यान 25 रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार होते. मुस्लिम बांधव मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदानाची तारीख 27 रोजी घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.  मुस्लिम बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनी मतदान तारखेत बदल करावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. याची दखल घेवून निवडणूक आयोगाने मतदान तारीख 25 ऐवजी 27 केली आहे.

त्यामुळे मुस्लिम बांधवांचा मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. औरंगाबादला 24 ते 26 फेबु्रवारी रोजी मुस्लिम बांधवांचा धार्मिक कार्यक्रम होत आहे. 10 वर्षातून एकदा होणार्‍या या कार्यक्रमास देशभरातून 10 लाखाहून अधिक मुस्लिम बांधव उपस्थित राहतात. तर दि.25 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार होते. या मतदानापासून मुस्लिम बांधव वंचित राहू नये म्हणून मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली.