होमपेज › Satara › परप्रांतीय युवकास पोक्सोंतर्गत अटक

परप्रांतीय युवकास पोक्सोंतर्गत अटक

Published On: Jun 29 2018 12:00AM | Last Updated: Jun 28 2018 10:48PMफलटण : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी  फलटणमध्ये एका युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला फलटण पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, गुरुवारी (दि. 28) सोमवार पेठ फलटण येथे दुपारी 3.30 वाजता पप्पूसिंग बचपणसिंग चितोडिया (वय 25, रा. जामनेर रोड, केसरनगर, ता. भुसावळ, जि. जळगाव) याने  एका अल्पवयीन मुलीला तुला खाऊ देतो, तू माझ्याबरोबर चल असे म्हणत त्या मुलीचा हात पकडून  वाईट हेतूने तिला ओढू लागला. यावेळी त्या मुलीने हिसका देऊन ती घाबरून पळून आली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार मामाला सांगितला. 

संबंधित युवक कारखाना रोडने चालत जात असल्याचे समजल्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो सापडल्यानंतर त्याला तेथील लोकांनी बेदम चोप दिला व त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. या युवकाने कोळकी ता.फलटण येथे आयुर्वेदिक औषधे (जडीबुटीया) चे पाल टाकले असल्याचे समजले असून पोलीस या प्रकाराचा तपास करीत आहेत. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.