Fri, May 24, 2019 20:31होमपेज › Satara › सातार्‍यात मटका अड्ड्यांवर छापे

सातार्‍यात मटका अड्ड्यांवर छापे

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 05 2018 12:10AMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेच्या राजवाडा येथील श्रीमंत अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाच्या शॉपिंग सेंटर पार्किंगमध्ये  बेकायदेशीर हॉटेल अद्यापही सुरू आहे. संंबंधिताने इमारतीच्या जिन्याखाली गाळा तयार केला असल्याचेही समोर आले. सातारा पालिकेची ही कारवाई ‘मॅनेज’ झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने  मात्र, सदाशिव पेठेतील शॉपिंग सेंटरच्या पार्किंगमध्ये छापा टाकून रहीम मधुकर साठे (वय 32, रा. मंगळवार पेठ) व हुसेन नबीलाल पठाण (वय 32, रा. लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, सातारा) यांना अटक केली. पोलिसांनी सातार्‍यात छापासत्र सुरू केल्याने मटका बुकींमध्ये खळबळ माजली.

सातारा नगरपालिकेच्या मिळकतींकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.शहराच्या भल्याच्या गप्पा मारून काही नगरसेवक सातारकरांच्या भल्याचा खोटा कळवळा आणतात. त्यांचा हा हडेलहप्पीपणा शहराच्या विकासाच्या मुळावर उठला आहे. अनेक चुकीच्या गोष्टी रेटून केल्या जात आहेत.  राजवाड्यासमोर सातारा पालिकेने बांधलेल्या श्रीमंत अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाच्या पार्किंगमध्ये अनेक महिन्यांपासून एकाने हॉटेल सुरु केले आहे. राजवाडा परिसरात नागरिकांना वाहनांच्या पार्किंगला जागा मिळत नाही. मात्र, इमारतीच्या पार्किंमध्ये हॉटेल घालण्यासाठी मुभा दिली जाणे, यासाख्या कारभाराचा नमुना जिह्यातील कुठल्याही नगरपालिकेत पहायला मिळणार नाही. सातारा पालिकेत अजब कारभार सुरु आहे. दि. 4 रोजीच्या अंकात  दै. ‘पुढारी’ने  ‘सातारा पालिकेचे पार्किंग विकले होऽऽ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले. त्यानंतर सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाला श्रीमंत अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाच्या पार्किंगमधील संबंधित अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र,   ही कारवाई निम्म्यावरच सोडून अधिकारी कारवाईसाठी शाहूपुरीत गेले. पार्किंगमधील कारवाईला सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला.   कारवाई टाळण्यासाठी सबंधिताला कानमंत्र देण्यात आला. त्याने सकाळी  हॉटेल बंद केले. बाहेरील साहित्याची आवराआवर केली आणि ते साहित्य त्याच पार्किंगमध्ये बेकायदेशीरपणे बांधलेल्या गाळ्यामध्ये ठेवण्यात आले. सायंकाळनंतर पुन्हा हॉटेल सुरु झाले. सातारा नगरपालिकेची कारवाई मॅनेज झाल्याचे स्पष्ट झाले. यावरुन सातारा नगरपालिकेत बोकाळलेली खाबुगिरी समोर आली आहे. भाषणबाजीत सातार्‍याची मातृसंस्था म्हणून सातारा पालिकेचा उल्लेख करणारे  नगरसेवक आता गप्प का? असा सवाल केला जात आहे.

पोलिसांनी मात्र कामगिरी चोख बजावली. ‘पुढारी’च्या वृत्ताची गंभीर दखल घेत सातार्‍यात ठिकठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर छापासत्र सुरु केले. सदाशिव पेठेतील राजमाता श्री. छ. सुमित्राराजे भोसले व्यापारी संकुलाच्या पार्किंमध्ये सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने छापा टाकला. त्याठिकाणाहून  रहीम मधुकर साठे (वय 32, रा.मंगळवार पेठ)  याला अटक केली. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड असा एकूण 922 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे  दाखल करण्यात आले. हा मटका अड्डा समीर कच्छी याचा असल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने साध्या वेशामध्ये पोलिसांना तैनात केले होते. यावेळी त्या ठिकाणी दोघेजण मटका घेत असल्याचे दिसून आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागल्यानंतर ते पळून गेले. मात्र, रहीम साठे मटका घेताना जागीच सापडला. कच्छी तसेच साठे दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याचप्रकारे मोळाचा ओढा ते आझादनगर जाणार्‍या रस्त्यावर मोकळ्या मैदानावरील जागेत बाबासो मारुती शिंदे(वय 55, रा. संगमनगर, सातारा) हा मनोज बकू मिठापुरे (रा. मोळाचा ओढा, सातारा) याच्या सांगण्यावरुन मटका घेत होता. त्यास रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्याकडून 2 हजार 222 रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. राजवाडा बसस्थानकाच्या पश्‍चिम बाजुस असलेल्या पानटपरीच्या आडोशास पापा गेणू गवळी (वय 30, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) हा स्वत:च्या आणि मटका व्यवसायिक सचिन प्रल्हाद सुपेकर (रा. कमानी हौदाजवळ, गुरुवारपेठ, सातारा) मटका घेत होता. त्यास रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्याकडून 2 हजार 152 रूपयांची रोकड जप्त करण्यात आले. संबंधितांवर पुढील कारवाई सुरु होती.