होमपेज › Satara › सातारा : फलटनमध्‍ये राईनपाडा घटनेच्‍या निषेधार्थ मोर्चा (video)

सातारा : फलटनमध्‍ये राईनपाडा घटनेच्‍या निषेधार्थ मोर्चा (video)

Published On: Jul 09 2018 12:36PM | Last Updated: Jul 09 2018 12:26PMफलटण  :  प्रतिनिधी 

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा ता.साक्री येथे हिंदू नाथपंथीय डवरी गोसावी समाजातील पाच जणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.  या घटनेचा निषेध करण्यासाठी फलटण शहर व ग्रामीण भागातील हिंदू नाथपंथीय डवरी गोसावी समाजाच्या वतीने सोमवारी सकाळी फलटण येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळी गरिबांना न्याय मिळालाचं पाहिजे, आरोपीना मरे पर्यंत फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. राईनपाडा घटनेमुळे  पाच जणांची कुटुंबे उघड्यावर आली आहेत.  या घटनेचा निषेध करण्यासाठी व या पाच कुटुंबातील लोकांना शासनातर्फे  २५ लाख रुपयांची मदत करावी,  या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.  मोर्चाचे निवेदन  तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.