Sat, Jan 19, 2019 19:52होमपेज › Satara › तळदेव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तळदेव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Published On: Dec 18 2017 2:43AM | Last Updated: Dec 17 2017 10:36PM

बुकमार्क करा

महाबळेश्‍वर : वार्ताहर

महाबळेश्‍वरजवळच असलेल्या तळदेव येथील ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महाबळेश्‍वर पोलिसांनी  संशयित आरोपी व अन्य चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तळदेव येथील कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आलेल्या तीन मुलांनी भाड्याने खोली घेतली होती. या खोलीसमोरच पीडित मुलीची मैत्रिण राहते. तिच्यासोबत संशयिताने संगनमत करून दि. 14 रोजी पीडित मुलीला तिच्या घरी बोलावून घेतले. ज्यावेळी पीडित मुलगी व तिची मैत्रिण तिच्या घराजवळ आली. त्यावेळी संशयित आरोपीचे दोघे मित्रही त्याच्यासोबत होते. मात्र, पीडित मुलगी आल्यानंतर हे दोघे रुमची चावी देऊन तिथून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने पीडित मुलीच्या मैत्रिणीने तिला संशयिताच्या रुममध्ये ढकलले. या प्रकारामुळे पीडित मुलगी बेशुध्द पडली. जेव्हा मुलगी शुध्दीवर आली तेव्हा खोलीत ती एकटीच होती. त्यानंतर पीडित  मुलगी भयभीत झाली होती. 

याबाबतची माहिती तिने आपल्या मैत्रिणीला दिली. मात्र, त्या मैत्रिणीने तुला चक्कर आली असेल, असे सांगून तिला माहिती देण्याचे टाळले. मात्र, दि. 15 रोजी पीडित मुलीची आत्या तळदेव येथे आली असता त्या मुलीने आत्याला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.