होमपेज › Satara › ‘पुढारी’कारांना हरिद्वारचे निमंत्रण

‘पुढारी’कारांना हरिद्वारचे निमंत्रण

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 10:41PMकराड : प्रतिनिधी 

कराडमधील योग शिबिर कमालीचे यशस्वी ठरल्यानंतर या शिबिराबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती केल्याबद्दल समाधान व्यक्त करत योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांनी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना हरिद्वार येथील योगपीठास भेट देण्याचे निमत्रंण दिले आहे. तसेच यावेळी भ्रमणध्वनीवरून झालेल्या चर्चेवेळी गेल्या 15 वर्षातील हितसंबंधाना उजाळा देत योग शिबिराच्या माध्यमातून दै. ‘पुढारी’शी असलेले संबंध अधिक द‍ृढ झाल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले.

योगगुरू रामदेव बाबा यांच्या कराडमधील तीन दिवसीय योग शिबिराची सोमवारी सकाळी सांगता झाली. त्यानंतर मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा हॉस्पिटलची पाहणी करताना दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. गेल्या 15 वर्षापासून माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधाना उजाळा देत रामदेव बाबा यांनी कराडमध्ये झालेल्या योग शिबिराची माहिती दिली. तसेच यावेळी हरिद्वार येथे होणार्‍या योगपीठास भेट द्यावी, असे  आपणास आमंत्रित करीत असल्याचे सांगितले.

यावेळी दै. पुढारीच्या कराड कार्यालयाचे ब्युरो मॅनेजर सतीश मोरे यांनी स्वामी रामदेव बाबा यांना दै. ‘पुढारी’चे अंकही भेट दिले. कृष्णा चॅरिटेबर ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, पंढरपूर येथील विठ्ठल 
रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले हेही यावेळी उपस्थित होते.

Tags : ramdev baba , invites, dr. jadhav , haridwar .