होमपेज › Satara › कराड : रजपूत युवकांकडून ‘पद्मावत'चे कौतुक (video)

कराड : रजपूत युवकांकडून ‘पद्मावत'चे कौतुक (video)

Published On: Jan 25 2018 2:44PM | Last Updated: Jan 25 2018 2:49PMकराड : प्रतिनिधी 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित "पद्मावत' या चित्रपटाला राज्यभर विरोध असतानाच कराडमध्ये मात्र गुरूवारी वेगळेच चित्र पहावयास मिळाले. काही रजपूत समाजाच्या युवकांनी या चित्रपटाचा सकाळी दहाचा पहिलाच शो नटराज चित्रपटगृहात पाहिला. पोलीस बंदोबस्तात चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाची स्तुती करत चित्रपटाविरोधात देशभर सुरू असलेल्या हिसंक आंदोलनाबाबत यापैकी काहींनी खेदही व्यक्त केला.

पद्मावत हा चित्रपट गुरूवारी रिलीज झाल्यानंतर सकाळी दहा वाजता कराडमध्ये पहिलाच शो "नटराज'मध्ये झाला. कराड तसेच कासेगाव परिसरात कामानिमित्त आलेल्या रजपूत समाजातील युवकांनी चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली होती. चित्रपटात शाहिद कपूरसह दीपिका पादुकोन यांच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक करत रजपूत समाजाची शौर्यगाथा दाखवण्यात आल्याचेही रजपूत युवकांनी दैनिक "पुढारी'शी बोलताना सांगितले. तसेच देशभर चित्रपटाविरूद्ध उमटत असलेल्या पडसादामुळे नटराज तसेच प्रभात चित्रपटगृहात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.