Thu, Sep 20, 2018 04:16होमपेज › Satara › थंडीत अनुभवले पावसाचे अप्रुप

थंडीत अनुभवले पावसाचे अप्रुप

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:38PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहर व परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सोमवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. केरळकडून महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीला ओखी वादळ थडकल्यानेच ऐन थंडीत  पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही काळ सर्वत्र वीजपुरवठा खंडित झाल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले.

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या पश्‍चिम सागरी किनारपट्टी भागाला ओखी वादळाचा तडाखा बसला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाच्या  सरी कोसळल्या. 

दरम्यान, लिंब (ता. सातारा) परिसरात पावसाच्या तुरळक सरी झाल्या. लिंबसह परिसरातील गोवे, वनगळ, कोंढवली, नागेवाडी भागांत अचानक तुरळक पाऊस झाला. 

पाचगणीत  सायंकळी 5 च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. महाबळेश्‍वरमध्येही पावसामुळे नागरिक व पर्यटकांची तारांबळ उडाली. वाई तालुक्यात सायंकाळी मांढरदेव व विविध भागांत विजांच्या कडकडाटामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. मांढरदेव परिसरात दाट धुके व जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस झाला.