Sat, May 25, 2019 22:36होमपेज › Satara › सातारा : कोळकीत हॉटेलवर छापा; ४ लाखांच्या मुद्देमालासह २ ताब्यात

सातारा : कोळकीत हॉटेलवर छापा; ४ लाखांच्या मुद्देमालासह २ ताब्यात

Published On: May 24 2018 11:30PM | Last Updated: May 24 2018 11:30PMफलटण : प्रतिनिधी

गेली अनेक दिवस कोळकी हद्दीमध्ये हॉटेल व धाब्यावर मोठ्या प्रमाणात चोरटी देशी व विदेशी प्रकारची दारू विकली जात असल्याचा सुगावा पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळत होता. या सुगाव्यावरून गुरुवारी रात्री ९ .३० च्या सुमारास फलटण शहर हद्दीतील कोळकी येथील हॉटेल वास्को व हॉटेल राज येथे छापा टाकला असता कार आणि दारू असा ४ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फलटण शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोळकी ता.फलटणचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदशनखाली महिला पोलिस उपनिरीक्षक देसाई व दळवी यांनी सहकार्‍यांसह जाऊन दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यात गाडी क्रमांक एमएच ११ एके ८००९ गाडीसह  ४ लाख ३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यामध्ये हॉटेल वास्को येथे दशरथ बाबाजी गावडे व हॉटेल राज येथे जनबा गोविंद चौघुलकर यांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.