Sun, Apr 21, 2019 04:17होमपेज › Satara › कोकराळे येथे जुगार अड्यावर छापा ;12 जणांना अटक 

कोकराळे येथे जुगार अड्यावर छापा ;12 जणांना अटक 

Published On: Aug 15 2018 1:26AM | Last Updated: Aug 15 2018 12:36AMऔंध : वार्ताहर

कोकराळे, ता. खटाव येथील एका मंदिराच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे दोन डाव मांडून जुगार खेळणार्‍या बारा जणांवर गुन्हा दाखल करून सुमारे 54 हजारांचे जुगार साहित्य, रोख रक्‍कम, मोबाईल व अन्य साहित्य औंध पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, औंधनजीकच्या एका छोट्या गावात सुरू असलेल्या एका मंदिरातील जुगार अड्ड्यावर औंध पोलिसांनी धडक कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, कोकराळे येथील एका ठिकाणी  बेकायदेशीरपणे पत्त्यांचा डाव मांडून राजरोसपणे जुगार खेळला जात असल्याची माहिती औंध पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोकराळे येथील एका मंदिराच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या पत्याच्या डावावर औंध पोलिसांनी छापा मारला असता बाळकृष्ण पांडूरंग बोबडे वय 63, राजेंद्र शंकर सावंत वय 41, विक्रम मच्छिंद्र गायकवाड वय 33, सचिन परशुराम सावंत वय 37, अजित मारुती गायकवाड वय 43, विलास दौलत गायकवाड वय 48, अमोल मच्छिंद्र गायकवाड वय 29, पोपट गणपत चव्हाण वय 68, तानाजी लक्ष्मण गायकवाड वय 60, रज्जाक इब्राहिम मुलाणी वय 59 ,रमेश दादासो सावंत वय 42,राजेंद्र आनंदराव सुतार वय 48 हे सर्व  रा. कोकराळे सहा सहा जणांचा गट दोन डाव मांडून पत्ते खेळत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी  जुगार साहित्य, मोबाईल,रोख रक्कम अशी एकूण 54 हजार चारशे दहा रूपयांचे साहित्य औंध पोलिसांनी जप्त केले. दहिवडीचे  उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील जाधव, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, कुलदीप कटरे,किरण जाधव,अमोल माने, तांबे, निकम यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली.