Sat, Jun 24, 2017 10:44
25°C
  Breaking News  

होमपेज › Satara › रहिमतपुरात शॉर्टसर्किटमुळे गादी कारखान्याला आग 

रहिमतपुरात शॉर्टसर्किटमुळे गादी कारखान्याला आग 

By | Publish Date: Jun 21 2017 3:42PM

रहिमतपुर : प्रतिनिधी 

रहिमतपुरमध्ये शॉर्टसर्किटमुळे एका गादी कारखान्याला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रहिमतपुरमधील गांधी चौकात साजित कादर नदाफ यांचा भाड्याच्या घरात गादी कारखाना आहे. या कारखान्यात आज दुपारी  शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग  नागरिकांसह नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन  आटोक्यात आणली. या घटनेत सुमारे एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.