Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Satara › पानटपरीत कार घुसून एकजण ठार 

पानटपरीत कार घुसून एकजण ठार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारानजीक हॉटेल मानससमोर भरधाव कार दुभाजकावर आदळून पानपट्टीमध्ये घुसली. या भीषण अपघातात एकजण ठार झाला असून, दोघेजन गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात मंगळवारी पहाटे झालेला आहे.

या अपघातात गंभीर जखमी झालेले भूपाल गायकवाड यांच्यावर उपचार सुरू असताना त्‍यांचा मृत्यू झाला. याशिवाय त्यांचा सहकारी मिथुन चक्रवर्ती, शंकर राहू (सध्या दोघे रा.हॉटेल मानस व मूळ रा.कर्नाटक) व कारचालक रंगराव दत्तात्रय वाठारकर (रा.म्हडा कॉलनी, कोल्हापूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, रंगराव वाठारकर हे स्विफ्ट कारमधून पुण्याच्या  दिशेने निघाले होते. यांची कार मंगळवारी पहाटे हॉटेल मानससमोर आल्यानंतर रस्त्यावरील दुभाजकावर त्‍यांची कार आदळली. या कारचा वेग अधिक असल्‍याने ही कार पलटी घेत हॉटेलसमोर असणार्‍या पानटपरीमध्ये घुसली. या पानटपरीमध्ये पानटपरी चालक भूपाल गायकवाड व मिथून चक्रवर्ती नेहमीप्रमाणे झोपलेले होते. दररोज हॉटेल बंद झाल्यानंतर ते दोघे नेहमीप्रमाणे पानटपरी बंद करुन आतून शटर ओढून झोपी जातात. सोमवारीही पानटपरीमध्ये ते झोपलेलेा होते.

या दरम्‍यान झालेल्‍या अपघातानंतर मोठ्याने आवाज झाल्याने हॉटेलमधील वॉचमन यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातानंतर तिघे जखमी झाल्याने मदतीसाठी याचना करत होते. पानटपरीमध्ये कार घुसल्याने त्यातील दोघांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. अखेर जखमींना बाहेर काढल्यानंतर तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तिघांना दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना यातील भूपाल गायकवाड यांचा मृत्यू झाला. तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Tags : satara ,pune bangalore highway, speed car, accident ,one killed, two injured,


  •