Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Satara › कस्तुरी क्लबचा दणक्यात शुभारंभ

कस्तुरी क्लबचा दणक्यात शुभारंभ

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 8:58PMकराड : प्रतिनिधी

दै.‘पुढारी’ च्या कस्तुरी क्लबच्या नवीन नावनोंदणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ नुकत्याच धडाक्यात करण्यात आला. यावेळी मान्यवर महिलांच्याकडून केक कापून नाव नोंदणी करण्यात आली. कस्तुरी क्लबकडून नेहमीच महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. यापुढेही वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमास कोरिओग्राफर सौ.मिनल ढापरे, माजी मुख्याध्यापिका सौ. मंजिरी ढवळे, कल्याणी इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या सतीश मोरे, सौ. विश्‍वजा महेश पाटील, सौ. नीता सुरेश जगताप, सौ. जयश्री जयवंत नलवडे,शहनाज अकबर शेख, सफिया शेख यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी सर्व ग्रुप लिडर्स उपस्थित होत्या. श्रुती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. 

गेले दोन वर्षे दै.‘पुढारी’ च्या कस्तुरी क्लबच्यावतीने सदस्यांना भरभरून कार्यक्रमांचा खजिना, आकर्षक गिफ्ट,  भरपूर लकी ड्रॉ देण्यात आले. यंदाची नवीन नोंदणी सुरू झाली असून यंदाही 550 रूपयांमध्ये कुकर तसेच 1 हजार रूपयांची हमखास गिफ्टस्, लकी ड्रॉची लयलूट, भरपूर डिस्काऊंट ऑफर्स व कार्यक्रमाची रेलचेल असून नवीन नाव नोंदणी सुरू झाली असून महिलांनी त्वरीत संपर्क साधावयाचा आहे. 

कस्तुरी क्लबतर्फे आज ‘अमर चाँदनी’ कार्यक्रम
दै. ‘पुढारी’ च्या कस्तुरी क्लबच्यावतीने शनिवार दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे ‘अमर चाँदनी’ ही श्रीदेवी व विनोद खन्ना यांच्या अजरामर गाण्यांची मैफिल सर्व महिलांसाठी मोफत आयोजित केली आहे. दै. ‘पुढारी’कस्तुरी क्लब व किशोरकुमार फॅन क्लबच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात नवीन सदस्य नोंदणी करण्यात येणार असून कार्यक्रमस्थळी  नोंदणी करणार्‍या सदस्यांना मोबाईल स्क्वेअरकडून मोबाईल गोरीला ग्लास पूर्णपणे मोफत मिळणार आहे.