Sat, Sep 22, 2018 08:43



होमपेज › Satara › ‘पुढारी एज्यु-दिशा’ देणार विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा

‘पुढारी एज्यु-दिशा’ देणार विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा

Published On: May 30 2018 2:23AM | Last Updated: May 29 2018 11:48PM



सातारा : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वपूर्ण वळण म्हणजे दहावी-बारावीचे वर्ष. या वर्षातच करिअरची दिशा ठरते. करिअरच्या या महत्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांसह पालकांची अवस्था गोंधळलेली असते. अशा द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी एज्यु-दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  12वीचा निकाल आजच जाहीर होत असून दहावीचाही निकाल लवकरच लागणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी ‘पुढारी’च्या  शैक्षणिक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तज्ज्ञांची व्याख्याने आणि नामवंत शैक्षणिक संस्थांचा सहभाग असणार्‍या ‘पुढारी एज्यु-दिशा’ मुळे विद्याथ्यार्र्ंची उज्ज्वल भवितव्याकडे होणारी वाटचाल अधिक सुकर होणार आहे. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक चाटे शिक्षण समूह, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे हे आहेत. सातार्‍यात दि.8 ते 10 जून या कालावधीत ‘एज्यु-दिशा 2018’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र, पुढारी भवन समोर हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. करिअर निवडीबाबत घेतलेला एखादा निर्णय चुकीचा ठरु शकतो. यामुळे आयुष्यभर पश्‍चात्ताप करण्याची वेळ विद्यार्थ्यांसह पालकांवर येते. दहावी-बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणती शाखा निवडायची, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत, स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करावी, शिक्षणाचे मार्ग कसे निवडावेत, शिक्षणाचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, मेडिकल, इंजिनिअरींगसोबत इतर कोणते शैक्षणिक कोर्सेस आहेत, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वाटा कोणत्या, परदेशी शिक्षणाच्या संधी कशा मिळतील, जॉब गॅरंटी असणारे शिक्षण कोणते, या व अशा विविध प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे प्रदर्शनाच्या एकाच छताखाली मिळणार आहेत. या प्रदर्शनात एकाच वेळी विविध नामवंत संस्था सहभागी होऊन त्यांच्याकडील अभ्यासक्रमांची आणि त्या अभ्यासक्रमांचे पुढचे भविष्य काय, त्यातील संधी काय आहेत याची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच प्रदर्शनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानेही होणार आहेत.

प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी आणि स्टॉल बुकिंगसाठी सातारा : जितेंद्र 8805007671 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.