Wed, Nov 21, 2018 23:32



होमपेज › Satara › चला.., तुम्हीही व्हा आता होम मिनिस्टर

चला.., तुम्हीही व्हा आता होम मिनिस्टर

Published On: Jun 29 2018 12:00AM | Last Updated: Jun 28 2018 10:19PM



सातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने महिला व युवतींसाठी मंगळवार, दि. 3 जुलै रोजी सौभाग्य मंगल कार्यालय सातारा येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी  महिला व युवतींसाठी वेशभूषा स्पर्धा, दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत.  

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने  महिला व युवतींसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  विविध स्पर्धा, वर्कशॉप घेतले जातात. त्यामुळे महिलांच्या  अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळत असतो. बर्‍याचदा सुप्तगुणांना वाव न मिळाल्याने त्याचा विकास होत नाही. अशा कार्यक्रमांमधून महिलांचा सर्वांगिण विकास साधला जात असून त्याचदृष्टीकोणातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये  उज्वल यश मिळवलेल्या गुणवंतांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकल्यास पुढील वाटचालीत प्रोत्साहन मिळावे, यासाठी  या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे सहप्रायोजक  गिरीषा वेल्थ मेकर प्रा. लि.चे शंकरराव कर्पे हे आहेत.   या संस्थेकडून  लोकांचा आर्थिकस्तर व गुंतवणूक याबाबतची जागरुकता वाढवण्याचे कार्य केले जाते. भविष्यातील पैशाचे योग्य नियोजन व मार्गदर्शन केले जाते. तसेच शेअर्स बाजार प्रशिक्षण, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, करन्सी, कमोडिटी, आयपीओ, बँक एफ.डी., लोन, बॉन्डस् इत्यादी प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी मिळण्याचे ठिकाण म्हणून गिरीषा वेल्थ मेकरकडे पाहिले जाते. सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच राज्याबाहेरही संस्थेचे कार्यक्षेत्र आहे.

वेशभूषा स्पर्धेसाठी विविध टीव्ही चॅनेल्सवरील मराठी सिरियल थीम ठेवण्यात आली असून सहभागी स्पर्धकांनी कोणत्याही एका पात्राची वेशभूषा परिधान करावयाची आहे. इच्छुक स्पर्धकांनी दि. 2 जुलैपर्यंत  नावनोंदणी  करावी, असे आवाहन दै. पुढारी कस्तुरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तेजस्विनी बोराटे (8805007192)   यांच्याशी संपर्क  साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.