Wed, Feb 20, 2019 19:52होमपेज › Satara › आंदोलन कसे करावे हे चंद्रकांतदादांनी शिकवू नये : तुपकर

‘आंदोलन कसे करावे हे चंद्रकांतदादांनी शिकवू नये’

Published On: Jul 15 2018 1:36PM | Last Updated: Jul 15 2018 2:20PMदहिवडी : प्रतिनिधी

कर्नाटक आणि केरळ राज्यात दुधाला 5 रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी असून ते कसे करावे हे चंद्रकांतदादा पाटील यांनी शेतकरी संघटनेस शिकवू नये असा टोला स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राज्याचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दहीवडी येथील सभेत दिला.

या सरकारची धोरणे शेतकऱ्यांना मारक असून उद्योजकांना मदत करणारी आहेत. शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. जर सरकारने हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल. कोणी सूर्याजी पिसाळ होऊन पोलीस संरक्षणात दूध घालण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या व संघटनेच्या वतीने आज मध्यरात्री पासून मुंबई व अन्य शहरांना दूध पुरवठा बंद करण्याचे आवाहन केले. तसेच आज रात्री 12 वाजता पंढरपूरला विठ्ठल रुख्मिनी मंदिरात दुग्ध अभिषेक करून आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दहिवडी येथे रविवारी सकाळी दूध उत्पादन संघ व शेतकरी यांचा मेळावा झाला.या मेळाव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष प्रा प्रकाश पोपळे,जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांच्यासह माण तालुक्यातील कार्यकर्ते व दुध उत्पादक उपस्थित होते.