Wed, Aug 21, 2019 02:06होमपेज › Satara › कराड :  शिवसेनेची आ. राम कदम यांच्या विरोधात निदर्शने

कराड :  शिवसेनेची आ. राम कदम यांच्या विरोधात निदर्शने

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 08 2018 6:37PMकराड : प्रतिनिधी 

 आमदार राम कदम यांनी शुक्रवारी माफी मागितल्यानंतरही  त्यांच्या विरोधात राज्यभरात  तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कराडमधील चावडी चौक परिसरात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आमदार राम कदम यांच्या फोटोला चप्पल मारत कदम यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 शिवसेनेचे शशिकांत हापसे, रामभाऊ रैनाक, अजित पुरोहित यांच्यासह महिला पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांनी आमदार राम कदम यांना पाठीशी घालू नये. त्यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करत भविष्याची याप्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.