Mon, Jul 15, 2019 23:45होमपेज › Satara › कुंटणखान्यावर छापा; महिलेसह तिघांना अटक

कुंटणखान्यावर छापा; महिलेसह तिघांना अटक

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 8:32PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरातील जुळे  सोलापूर भागातील श्रीनगरमधील घरगुती कुंटणखान्यावर विजापूर नाका पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली, तर दलाल महिलेसह तिघांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली.

लक्ष्मी  यशवंत  सोनवणे  -पाटील ऊर्फ प्रयागबाई धोंडीबा देवकते (वय 75, रा. देवडगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), आनंद महादेव  कवठे (वय 32, रा. मुस्ती, ता. दक्षिण  सोलापूर), घरमालक सुभाष धोंडीबा  देवकते (वय 50, रा. श्रीनगर, जुळे सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस उपनिरीक्षक अनिल चौगुले यांनी फिर्याद दाखल केली आहे.

विजापूर नाका पोलिसांना जुळे सोलापुरातील श्रीनगरमधील घरामध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी एक बनावट गिर्‍हाईक पाठवून श्रीनगरातील त्या घरावर मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. त्यावेळी एका पीडित महिलेला लक्ष्मी सोनवणे हिने पैशाचे आमिष दाखवून ती राहात असलेल्या घरात गिर्‍हाईक आनंद कवठे याच्यासाठी वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली. 

पोलिसांनी यावेळी लक्ष्मी सोनवणे, आनंद कवठे, घरमालक सुभाष देवकते या तिघांना अटक करून याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याचा पोलिस निरीक्षक फुगे तपास करीत आहेत.

 

Tags : solapur, solapur news, crime, prostitution area raid, women arrested,