होमपेज › Satara › कराडमध्ये घर विकण्यावरून आईसह भावाचा खून 

कराडमध्ये घर विकण्यावरून आईसह भावाचा खून 

Published On: Apr 09 2018 10:42AM | Last Updated: Apr 09 2018 10:42AMकराड : प्रतिनिधी

सेवानिवृत्त नायब तहसिलदारांच्या थोरल्या मुलाने घर विकण्यास विरोध केल्याने धाकट्या भावासह आपल्या आईचा गुप्तीने वार करून व लोखंडी पाईपने मारहाण करून खून केला. मलकापूर (ता. कराड)  येथे सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. राजेश गजानन घोडेके (वय ४०) आणि जयश्री गजानन घोडके (वय ६३) असे त्या दुर्दैवी मायलेकांची नावे आहेत. तर राकेश गजानन घोडके (वय ४३) असे संशयिताचे नाव आहे. या दोन्ही खुनापूर्वी संशयिताने आपल्या बायकोवरही वार केला होता. 

घोडके कुटूंबे साळशिरंबे येथील असून ते मलकापूर येथील आझाद कॉलनीत वास्तव्यास आहे. मलकापूरमधील घर विकण्याचा तगादा लावला होता. मृत राजेश हे इस्लामपूर येथे भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत होते. त्यांची नुकतीच फलटण येथे बदली झाली होती. ते सोमवारी हजर होणार होते. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भाऊ राजेश व आई जयश्री यांचा राकेश याने गुप्तीने आठ ते दहा वार करून खून केला. यावेळी त्याने अंगणातील लोखंडी पाईप व बादलीनेही डोक्यात वार केला. खून केल्यानंतर संशयित राकेश अंगणातच बसून होता. यावेळी मलकापूरमध्ये राहणारे कराड शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सतीश जाधव आणि होमगार्ड शेडगे यांनी मोठ्या धाडसाने हातात गुप्ती व लोखंडी पाईप असताना त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.