Mon, Jan 21, 2019 19:11होमपेज › Satara › उंब्रज : लक्झरी बस अपघातात २ ठार, तीन जखमी 

उंब्रज : लक्झरी बस अपघातात २ ठार, तीन जखमी 

Published On: Jan 05 2018 11:13AM | Last Updated: Jan 05 2018 11:14AM

बुकमार्क करा
उंब्रज : प्रतिनिधी

खाजगी लक्झरी बसने एसटीच्या प्रतिक्षेत उभ्या राहिलेल्या दोन महिलांना व दोन कॉलेज विद्यार्थी याना ठोकरले. या अपघातात खासगी बस चालक आणि महिलेचा मृत्यू झाला. भागीर्थी आनंदा सोनावले (­­वय 57 रा.डेरवण ता.पाटण)­­­ असे अपघातात ठार झालेल्या माहिलेचे नाव आहे तर रोहित प्रमोद रामुगडे (वय 17 रा.चोरे ता.कराड) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. अपघातातील इतर जखमींची नावे समजू शकली नाहीत.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज (ता.कराड) येथील बसस्थानकासमोर मुंबई ते बेळगाव जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसने एसटीच्या प्रतिक्षेत उभ्या राहिलेल्या दोन महिलांना व दोन कॉलेज विद्यार्थी याना ठोकरल्याने एक महिला जागीच ठार तर दोन विद्यार्थी आणि एक महिला गंभीर जखमी झाले. तसेच लक्झरी चालकाचा भितीने जागीच मृत्यू झाला आहे.  या अपघातात लक्झरी महामार्गाच्या दुभाजकावर आदळली व सुमारे पन्नास फूट दुभाजकाचे लोखंडी रेलींग उचकटून टाकले.हा अपघात आज शुक्रवार दि.५ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वा.च्या सुमारास घडला.